निषेध : आरक्षण बचाव कृती समिती, प्राध्यापकांचीही निदर्शनेयवतमाळ : कोणत्याही जातीचा नव्याने अनुसुचीत जमातीमध्ये समावेश करू नये अशी मागणी करीत उपमुख्यमंत्र अजित पवार यांना येथे काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात आला.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीने आरक्षण वाचविण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्याला जात होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी या विषयावर चर्चा केली. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी अरविंद कुडमेथे, विठोबाजी मसराम, वसंत कनाके, दीपक पुरचाल, किरण कुमरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.प्राध्यापकांची निदर्शनेविद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांना नेट-सेटमध्ये सूट दिली. न्यायालयाने याबाबत प्राध्यापकांच्या बाजूने निर्णय दिला. यानंतही राज्य शासनाने प्राध्यापकांना नेट-सेट सक्तीचे धोरण अवलंबिले. याविरोधात महाराष्ट्र राज्य प्राध्यापक संघाने शनिवारी उपमुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौऱ्यात निदर्शने केली. युजीसी आणि उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निर्णय दिला. मात्र राज्य शासनाने या निर्णयाला केराची टोपली दाखविली. १९९९ ते २००० पर्यंतच्या प्राध्यापकांना युजीसीने नेट-सेटमधून सूट दिली. हा निर्णय राज्य शासनाला पाठविला. मात्र राज्य शासनाने ते मान्य केले नाही. या प्रकाराचा निदर्शने करून शनिवारी निषेध नोंदविला. यावेळी नुटाचे प्रा.डॉ.रमाकांत कोलते, प्रा.दिनकर वानखडे, प्रा.डॉ.अनंत अट्रावलकर, प्रा.सी.बी. देशपांडे या सेवानिवृत्त प्राध्यापकांसह प्राचार्य डॉ.विनायक भिसे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी प्रा.डॉ. विवेक देशमुख, प्रा.डॉ.राजेंद्र भांडवलकर, प्रा.अरुण फुलझेले, प्रा.डॉ.नारायण मेहरे, प्रा.कमल राठोड, प्रा.शशिकांत वानखडे, प्रा.चंद्रशेखर ठाकरे, डॉ.विनोद तिडके, प्रा.सुधीर त्रिकांडे, डॉ.सचिन जयस्वाल, प्रा.माणिक मेहरे, डॉ.सुनील कांबळे, प्रा.अविनाश शिर्के यांच्यासह अनेकजण उपस्थित होेते. (शहर वार्ताहर)
उपमुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे
By admin | Updated: July 27, 2014 00:19 IST