शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

भाजपचे जुने तीन शिलेदार रिंगणात; यवतमाळ, वणी आणि राळेगाव येथे विद्यमान आमदारांनाच संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 18:31 IST

दोन जागांचा तिढा : दिग्रस, पुसदमध्ये युतीतील घटक पक्षाचे उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : उमेदवारी कुणाला याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. प्रत्येक पक्षातील इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता उमेदवार असे ठामपणे सांगण्यात येत आहे. भाजप जिल्ह्यात नव्या चेहऱ्यांना संधी देणार, भाकरी पलटवणार अशी चर्चा जोरात होती. मात्र जुन्याच शिलेदारांवर भरवसा दाखवत यवतमाळ, वणी आणि राळेगाव येथे विद्यमान आमदारांनाच संधी दिली आहे.

उमरखेड आणि आर्णी मतदारसंघात उलटफेर करण्याबाबत पक्षस्तरावर चर्चा सुरू आहे. तेथे विद्यमान आमदारापेक्षा तोडीचा चेहरा शोधला जात आहे. उमरखेडमध्ये माजी आमदार नजरधने यांना पुन्हा संधीची शक्यता आहे तर केळापूरमध्ये मतदारसंघाबाहेरचा नवीन चेहरा दिला जाऊ शकतो. सध्या या दोन्ही मतदारसंघांचा निर्णय राखीव ठेवला आहे. शिवाय उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून येथे महायुतीतील आठवले गटाने दावा केला आहे. 

दिग्रस विधानसभेत शिंदेसेनेकडून पालकमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी पक्की असून त्यांच्या जाहीर प्रचारालाही सुरुवात झाली आहे. त्यासोबतच पुसदमध्ये मात्र द्विस्ट निर्माण झाला आहे. विद्यमान आमदार इंद्रनील नाईक अजित पवार गटात राहतील की बदलत्या वातावरणानुसार शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचा शेला खांद्यावर घेतील याबाबतच्या घडामोडी सुरू आहेत. असे झाल्यास महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जातो. मतदारसंघावर भाजप दावा करणार की अजित पवार गटाकडूनच उमेदवार दिला जाणार याचाही अंदाज लावणे तूर्तास कठीण आहे. 

महायुतीतील भाजपने उमेदवार जाहीर करून चित्र स्पष्ट केले आहे. सध्या तरी युतीतील विद्यमान सात आमदारांपैकी चार आमदारांची उमेदवारी पक्की आहे. उर्वरित तीन जागांवर खल सुरू आहे. महाविकास आघाडीत अजूनही कुठलाच निर्णय झालेला नाही. उद्धवसेना किती जागा घेणार, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तीन घटक पक्षात जागा वाटपावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. पुढचे दोन दिवस आघाडी व युतीतील इच्छुकांची धडधड वाढविणारे आहे. श्रेष्ठीचा काय आदेश येतो, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे. 

महाविकास आघाडीचे इच्छुक दिल्लीतमहाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी दिल्लीकडे कूच केली आहे. माजी मंत्री वसंत पुरके यांचा समावेश आहे. तसेच महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यासुद्धा दिल्लीत तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया हे मुंबईत आहेत. इच्छुकांकडून राज्याच्या नेत्यानंतर आता दिल्लीत मोर्चेबांधणी केली जात आहे. दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

उमरखेडसाठी आठवले गटही आक्रमक महायुतीमधून पाच ते सहा जागा रिपब्लिक पक्षाला सोडण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यामध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे, आठवले यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांसह इच्छूक उमेदवार महेंद्र मानकरही उपस्थित होते.

रासपही उमेदवार देणार महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सात जागांवर उमेदवार देण्यात येणार असल्याचे पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसिफ शेख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले, याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सूरज ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्कलवार, महानगराध्यक्ष स्वप्नील देशमुख, धरमसिंह ठाकूर, शुभम रूपनर आदी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wani-acवणीralegaon-acराळेगावYavatmalयवतमाळElectionनिवडणूक 2024BJPभाजपा