शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची महिलेला संधी, काँग्रेसने मात्र डावलले

By admin | Updated: March 12, 2017 00:48 IST

जिल्हा परिषदेतील भाजपाच्या गटनेतेपदी मंगला पावडे, तर काँग्रेसच्या गटनेतेपदी राम देवसरकर यांची निवड झाली.

जिल्हा परिषद गटनेते : पावडे, देवसरकरांची वर्णी यवतमाळ : जिल्हा परिषदेतील भाजपाच्या गटनेतेपदी मंगला पावडे, तर काँग्रेसच्या गटनेतेपदी राम देवसरकर यांची निवड झाली. भाजपाने महिलेला संधी दिली, तर काँग्रेसने ११ मधील नऊ महिलांना डावलून पुरुषाला संधी दिली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत पक्षांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. दरम्यान, भाजपाने शनिवारी येथील भावे मंगल कार्यालयात गटनेता निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेतली. बैठकीत सर्वानुमते जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंगल पावडे यांची गटनेते म्हणून निवड केली. संघाच्या मुशीतील पावडे यांची गटनेतेपदी निवड झाल्याने जिल्हा परिषदेतील सदस्यांवर संघाचा वॉच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. मंगला पावडे वणी तालुक्यातील घोन्सा-कायर गटातून निवडून आल्या आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या गटनेतेपदी उमरखेड तालुक्यातील विडूळ-चातारी गटातून विजयी झालेले राम देवसरकर यांची निवड झाली. यासाठी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात शनिवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पराभूत उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. त्यात सर्वानुमते राम देवसरकर यांची निवड झाली. या बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पक्ष निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे आणि प्रा. वसंतराव पुरके, माजी आमदार विजयराव खडसे, मोहम्मद नदीम, राहुल ठाकरे आदी उपस्थित होते. बैठकीत काँग्रेस नेत्यांनी पराभवाची कारणमिमांसाही केली. (शहर प्रतिनिधी) नेमकी सत्ता कुणाची ?, गूढ कायम जिल्हा परिषदेत नेमका कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचा दावा मजबूत आहे. मात्र शिवसेना सत्ता स्थापनेसाठी कुणाची मदत घेणार, हाच खरा प्रश्न आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने गटनेत्यांची नोंदणी करण्यासाठी एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतल्याने भुवया उंचावल्या आहे.