शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

जिल्ह्यात भाजपाचे उघडणार पुन्हा खाते

By admin | Updated: October 18, 2014 23:01 IST

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होत आहे. मात्र त्यापूर्वीच कोण निवडून येणार, कोण पडणार याचे अंदाज वर्तविले जात आहे. प्रत्येक जण आपला अंदाज खरा ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे.

विधानसभा : काँग्रेसच्या जागांवर गंडांतरयवतमाळ : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होत आहे. मात्र त्यापूर्वीच कोण निवडून येणार, कोण पडणार याचे अंदाज वर्तविले जात आहे. प्रत्येक जण आपला अंदाज खरा ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या तमाम अंदाजांचा फुगा अवघ्या २४ तासात फुटणार आहे. यावेळी जिल्ह्यात भाजपाचे खाते उघडण्याचा आणि त्याचा फटका काँग्रेसला बसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी पाच जागा काँग्रेसकडे तर राष्ट्रवादी व शिवसेनेकडे प्रत्येकी एक जागा आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीतसुद्धा काँग्रेसने आपल्याकडील जागा कायम राखली. या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसला आपल्या सर्व जागा कायम राखता येतात की नाही, याबाबत साशंकता आहे. उमरखेड, यवतमाळ, राळेगाव, आर्णी, वणी या जागा काँग्रेसकडे आहेत. मात्र त्यापैकी किमान दोन जागा काँग्रेसच्या हातून जाण्याची चिन्हे दिसत आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तर काँग्रेसची पाच पैकी एखादी जागा कायम राहील. या जागांवर विरोधी पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे. यावेळी २००४ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. शिवसेना व राष्ट्रवादीला आपली जागा कायम राखण्यात यश मिळेल, असा अंदाज आहे. मात्र उर्वरित जागांवर आपली संख्या या दोनही पक्षांना वाढविता येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावेळी काँग्रेसमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र मरगळ दिसून आली. स्टार प्रचारकांच्या सभा नाहीत की, नेत्यांमध्ये प्रचाराचा उत्साह नाही. प्रत्येक जण केवळ आपआपले गणित जमविण्यात व्यस्त दिसले. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदा यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोेरे गेल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले. काँग्रेसला जिल्ह्यात केवळ एकमेव सेनापती होते, तेही स्वत: निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. काँग्रेसच्या फौजेचा पत्ताच नव्हता. अशाही वातावरणात काँग्रेसच्या एखाद दोन जागा कायम राहिल्यास आश्चर्यच मानावे लागेल. गेली पाच वर्ष भाजपाचा एकही आमदार जिल्ह्यात नव्हता. यावेळी मात्र भाजपा खाते उघडणार असे वातावरण दिसू लागले आहे. एवढेच नव्हे तर राज्यात भाजपाची सत्ता येण्याची चिन्हे एक्झीट पोलच्या अंदाजानुसार दिसू लागताच जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबतही तर्क लावले जात आहे. कॅबिनेट मिळणार की राज्यमंत्री पद, कुणाला मिळणार, मिळाल्यास कोणते खाते मिळणार, ले-आऊटचा अनुभव लक्षात घेता नगरविकास खात्यावर दावा सांगावा, इथपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांचे अंदाज आणि आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. रविवारी सकाळी ८ वाजतापासून सातही मतदारसंघात मतमोजणी सुरू होणार असून दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. निकालासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)