शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या शोधात निघाली भाजपा

By admin | Updated: July 9, 2014 23:53 IST

पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व स्विकारणारे पालकमंत्री मात्र जिल्ह्यात फिरकायला तयार नाही. आता भाजपाने पालकमंत्र्यांसाठी

शेतकरी संतापले : आपण यांना पाहिलंत का ?यवतमाळ : पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व स्विकारणारे पालकमंत्री मात्र जिल्ह्यात फिरकायला तयार नाही. आता भाजपाने पालकमंत्र्यांसाठी चक्क शोध मोहीम हाती घेतली आहे. ‘आपण यांना पाहिलत काय’ अशा आशयाचे पालकमंत्र्यांच्या छायाचित्रासह पत्रकच वितरित करणे सुरू केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा बिकट अवस्थेतून जात आहे. या स्थितीत संकटावर मात करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. अशा स्थितीत दुष्काळग्रस्तांना धीर देण्यासाठी पालकमंत्री आलेच नाही. त्यामुळे भाजपाने त्यांचा शोध सुरू केला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी एक निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. पालकमंत्री दिसल्यास भाजपा कार्यालयात कळविण्याची सूचना निवेदनात करण्यात आली आहे. यासोबत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासोबत शेतकऱ्यांना सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष दिनेश चिंडाले, बाळासाहेब शिंदे, अमर दिनकर, जुगल तिवारी, मुन्ना मिश्रा यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)