यवतमाळ : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महासंपर्क अभियानासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे बुधवारी यवतमाळात येत आहेत. महासंपर्क अभियानाचा प्रारंभ येथील संदीप मंगलम्मध्ये सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहतील. भाजपाच्या महासंपर्क अभियानाची सुरुवात यवतमाळातून केली जात आहे. महासंपर्क अभियानात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार मदन येरावार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम आदींच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणी झाल्यानंतर आता सक्रिय सदस्य नोंदणी केली जाणार आहे. सदस्यांच्या घरी जाऊन कार्यकर्ते त्यांच्याकडून माहिती भरुन घेणार आहे. याचा शुभारंभ यवतमाळातून केला जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आज यवतमाळात
By admin | Updated: July 15, 2015 02:58 IST