शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातच उमेदवारीसाठी रस्सीखेच

By admin | Updated: June 11, 2014 23:36 IST

आर्णी-केळापूर या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित विधानसभा मतदारसंघात भाजपामध्येच उमेदवारीची सर्वाधिक चुरस आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा हा मतदारसंघ. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी

काँग्रेसमध्ये पिता-पुत्राचा दावा : अहीरांचा शब्द निर्णायक, पाठिराखा गेल्याने धुर्वेंची कोंडीराजेश निस्ताने - यवतमाळ आर्णी-केळापूर या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित विधानसभा मतदारसंघात भाजपामध्येच उमेदवारीची सर्वाधिक चुरस आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा हा मतदारसंघ. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी यावेळी त्यांचा मुलगा जितेंद्र मोघे यांचेही नाव चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे हंसराज अहीर यांना तब्बल ५९ हजार ८१४ मतांची आघाडी मिळाल्याने काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. भाजपाकडून प्रामुख्याने मिलिंद धुर्वे, संदीप धुर्वे, उद्धवराव येरमे, शामकांत झळके, राजू तोडसाम आदी नावांची चर्चा आहे. या मतदारसंघावर शिवसेनेनेही दावा सांगितला असून एका महिला जिल्हा परिषद सदस्याचे पती वर्षभरापासून कामाला लागले आहे. खासदार हंसराज अहीर यांच्या शब्दावर भाजपाचा उमेदवार ठरणार, एवढे निश्चित. राळेगावसाठी चर्चेत असलेले जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे यांचे नाव आर्णी-केळापूरसाठी एका नेत्याकडून रेटले जात आहे. माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे हेसुद्धा गोपीनाथ मुंडेंच्या पाठबळावर प्रयत्नात होते. मात्र त्यांची आता कोंडी झाली आहे. गतवेळचे उमेदवार उत्तमराव इंगळे यांनीे यावेळी किनवटवर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभेतील आर्णी विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख शामकांत झळकेसुद्धा भाजपाकडून जोर लावून आहे. लोकसभेत पराभव झाल्यानंतर शिवाजीराव मोघे जमिनीवर आले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात मुलासोबत पुन्हा सामान्य मतदारांच्या भेटीगाठी, आढावा बैठकी सुरू केल्या आहेत. त्यांचा मुलगा मतदारसंघात भावी उमेदवार म्हणून फिरत असला तरी त्याला मतदार आणि काँग्रेस पक्षातील जेष्ठ पदाधिकारी-कार्यकर्ते कितपत स्वीकारतात यावर पुढचे गणित अवलंबून आहे. अहिरांना लोकसभेत जेवढा मतांचा लिड (५९ हजार) मिळाला तेवढाच लिड आम्हाला विधानसभेत पाहून घ्या, असा दावा मुलाकडून जाहीररीत्या केला जात असल्याने मोघेंनी लोकसभेत नेमके कुणाचे काम केले, असा संभ्रम निर्माण झाला आहे. मोघेंबाबत असलेली नाराजी मतदारांनी लोकसभेत दाखवून दिली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस सावधानी बाळगत आहे. भाजपामध्ये उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत असली तरी त्यातील बहुतांश उमेदवार हे मतदारसंघाबाहेरील आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवारावर जोर दिला आहे. सतत पक्षबदल करून स्वत:ची किंमत वाढवून घेणाऱ्या नेत्याला यावेळी पक्षाने किंमत देऊ नये, असा भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सूर आहे. प्रत्येक वेळी हा नेता कुणाच्याही विजयाचे श्रेय आपल्याकडे खेचून घेतो  अशी ओरड आहे. आर्णी-केळापूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारीसाठी खासदार हंसराज अहीर कुणाच्या पारड्यात वजन टाकतात यावर सर्व खेळ अवलंबून आहे. भाजपातून दोघांनी बंडखोरीचीही तयारी चालविली आहे. भाजपाकडून सन्मान मिळत नसल्याने शिवसेनेत नाराजी आहे. या मतदार संघातील राष्ट्रवादीचा गट काँग्रेसवर आणि विशेषत: मोघेंवर नाराज आहे. या नाराजीतूनच अहिरांच्या मतांचा आकडा वाढल्याचे बोलले जाते.