शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीच्या विकासकामांत भाजपा सरकारचा दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:31 IST

पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदींनी आर्णीत येऊन २१ आश्वासने दिली. त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. उलट येथील एमआयडीसी, निम्न पैनगंगा प्रकल्प या कामांवर ‘काँग्रेसचे प्रकल्प’ म्हणून आता राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केला.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : विजय दर्डा यांना निम्न पैनगंगासाठी साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदींनी आर्णीत येऊन २१ आश्वासने दिली. त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. उलट येथील एमआयडीसी, निम्न पैनगंगा प्रकल्प या कामांवर ‘काँग्रेसचे प्रकल्प’ म्हणून आता राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केला. भाजपा सरकारच्या या दुजाभावाबाबत गुरुवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा माजी खासदार विजय दर्डा यांना निवेदन देण्यात आले.विजय दर्डा गुरूवारी उमरी पठारच्या वृद्धाश्रमातील कार्यक्रमासाठी आले असता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील विशेषत: आर्णी तालुक्यातील अनेक प्रश्न निवेदनातून त्यांच्या निदर्शनास आणून दिले.शासनाने काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र आर्णीसह उर्वरित तालुक्यांना टाळण्यात आल्याने असंतोष आहे. वीज भारनियमनाने रबी हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी समस्या निवेदनात मांडण्यात आली.विशेष म्हणजे, शिवाजीराव मोघे मंत्री असताना त्यांनी आर्णी तालुक्यासाठी जवळा येथे एमआयडीसीसाठी प्रयत्न सुरू केले. जमीन अधिग्रहणाची महत्त्वाची प्रक्रियाही पार पाडली. मात्र आता भाजपा-शिवसेना युती शासनाने उद्योग व रोजगारासाठी अत्यंत उपयुक्त अशा या प्रकल्पाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. काँग्रेस शासनाच्या काळात निम्न पैनगंगा प्रकल्पावर ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ७७६ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली. लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाची प्रगती युती शासनाने पूर्णपणे थांबविली आहे. ‘काँग्रेसचा प्रकल्प’ म्हणून सरकार याकडे पाहते आहे, अशी खंत व्यक्त करण्यात आली. यावेळी विजय दर्डा यांच्या समवेत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा उपस्थित होते. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, आर्णीचे माजी नगराध्यक्ष आरिज बेग, बाळासाहेब शिंदे, दिग्विजय शिंदे, राजू विरखेडे, पंडित बुटले आदी उपस्थित होते.नरेंद्र मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ची पोलखोल२०१४ च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला. त्यात शेतकऱ्यांना २१ आश्वासने दिली. त्यातील एकही पूर्ण केले नाही. त्यांच्या या फसव्या आश्वासनाची काँग्रेस गेली चार वर्षे ‘पोलखोल’ करीत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि यवतमाळ जिल्ह्याचे भूमिपूत्र या नात्याने दाभडीतील आश्वासनांची नरेंद्र मोदींना आठवण करून द्यावी, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय दर्डा यांच्यापुढे व्यक्त केली.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाYavatmalयवतमाळ