शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व

By admin | Updated: February 21, 2017 01:28 IST

कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणुकीत भाजपाने तालुक्यात सहकार क्षेत्रात प्रथमच प्रवेश केला आहे.

सहकारात खाते उघडले : प्रथमच मोठ्या फेरबदलाचे संकेतमहागाव : कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणुकीत भाजपाने तालुक्यात सहकार क्षेत्रात प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष सुरेश नरवाडे यांनी पक्षातून बंडखोरी करत स्वत: पॅनल तयार केले होते. त्यांनी सर्व विरोध झुगारून सहकारातील निवडणूक लढविली. यापूर्वी त्यांनी एक संचालक अविरोध आणला आहे. स्वत: व्यापारी मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार आणी विद्यमान संचालक स्वप्निल नाईक यांचा त्यांनी पराभव केला आहे. तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या संस्थेवर प्रथमच मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी करून बाजार समितीची निवडणुक लढवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे नाव समोर करून निवडणुका लढवण्यात येत आहेत, प्रत्यक्षात बंगल्यातून सुचवलेले चेहरे निवडणुकीत पराभूत कसे करता येतील याचेच नियोजन होताना दिसत आहे. त्याच मानसिकतेतून स्वप्निल नाईकांचा पराभव करण्यात आला असल्याची कुरकूर पक्षात सुरू झाली आहे. सर्व पक्षीय आघाडीत भाजपाचे सुरेश नरवाडे , दीपक आडे, अमर दळवे तर कांँग्रेसचे श्याम गंगाळे, विठ्ठल पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. अ‍ॅड गजेंद्र देशमुख गटाचा एक अन्य अकरा जागा राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसत असले तरी संस्थेवर वरिष्ठांनी सुचवलेला सभापती-उप सभापती पदाचा चेहरा डावलून विशिष्ट गटाच्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी पडद्याआड खलबत सुरू झाले आहे. यामध्ये नेमक्या काय घडामोडी होतात, याकडे सबंधितांचे लक्ष लागले आहे. आमदार राजेंद्र नजरधने यांच्या अध्यक्षतेखाली विजयी सभा खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, संभाजी नरवाडे, दौलत नाईक, सिताराम ठाकरे, साहेबराव पाटील कदम, यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेला तालुक्यातील सर्व नेते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)