शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी अल्टीमेटम

By admin | Updated: February 8, 2016 02:29 IST

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे भिजत घोंगडे कायम असून आता चक्क वरिष्ठ स्तरावरून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी १० फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला आहे.

१० फेब्रुवारी : चंद्रपूरवरून येणार निवडणूक निरीक्षकयवतमाळ : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे भिजत घोंगडे कायम असून आता चक्क वरिष्ठ स्तरावरून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी १० फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला आहे. यासाठी चंद्रपूरवरून निवडणूक निरीक्षक येणार आहे. यामुळे इच्छुकांच्या मोर्बेबांधणीला वेग आला आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक पाच जागा जिंकल्या. त्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात पक्ष बांधणी झाली नाही. अशा पार्श्वभूमीवर आता जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. गत महिनाभरापासून भाजपाच्या जिल्हा निवडीचे गुऱ्हाळ सुरू आहे. विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा या तीन जिल्ह्यातीलच तिढा कायम असल्याने शेवटचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे प्रदेश संघठन महामंत्री आले असता त्यांच्यासमोर अनेकांनी पक्ष कार्यावर नाराजी व्यक्त केली. यात इच्छुकासोबतच विद्यमान जिल्हाध्यक्षांचे हितचिंतक असलेल्यांचाही समावेश होता. याशिवाय विधानसभा निवडणूक काळात पांढरकवड्यात एबी फॉर्मवर आलेली दोन नावे, दारव्हा व पुसद येथील उमेदवारी यावर आता संशय व्यक्त होत आहे. शिवाय विद्यमान जिल्हाध्यक्षांना असलेले वरिष्ठांचे पाठबळ सध्या सैल झाले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या महत्वकांक्षा आणखीच वाढल्या आहे. अध्यक्ष निवडीसाठी अर्बन बँक निवडणुकीतील सक्रियताही महत्वाची ठरणार आहे. या निवडीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णपणे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे भाजपासोबतच संघाकडूनही होकार मिळविण्यासाठी फिल्डींग लावली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) हे आहेत इच्छुक भाजपा जिल्हाध्यक्षासाठी माजी आमदार उत्तमराव इंगळे, मनोज इंगोले, अमर दिनकर, महादेव सुपारे, प्रवीण प्रजापती, राजू पडगीलवार या इच्छुकांकडून प्रयत्न केले जात आहे. याशिवाय विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनीसुद्धा श्रेष्ठींपुढे विधानसभेतील यशाचा आलेख मांडत जिल्हाध्यक्षपद कायम ठेवण्यासाठी मनधरणी चालविली आहे.