शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सूत गिरणी निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष पराभूत

By admin | Updated: June 20, 2016 02:20 IST

राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाच्या तालुकाध्यक्षाचा मात्र बाबासाहेब नाईक सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला.

२० संचालक अविरोध : राष्ट्रवादीने मारली बाजीपुसद : राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाच्या तालुकाध्यक्षाचा मात्र बाबासाहेब नाईक सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला. एका जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारीत सूत गिरणीवर आपले वर्चस्व कायम केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी २० संचालक अविरोध निवडून आले होते. सहकार क्षेत्रात अग्रगण्य महागाव तालुक्यातील पिंपळगाव सूत गिरणीच्या एका जागेसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत पुसद भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे यांचा दारूण पराभव झाला. त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आप्पाराव घुक्से यांनी पराभूत केले. भवरे यांना केवळ ८७ मते मिळाली असून त्यांची अनामतही जप्त झाली. तर विजयी उमेदवार घुक्से यांना १ हजार ६४८ मते मिळाली आहे. काँग्रेस, शिवसेना व भाजपा पुरस्कृत सहकार बचाव आघाडीने या निवडणुकीत उडी घेत भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे यांना रिंगणात उतरविले. विशेष म्हणजे यापूर्वी सूत गिरणीच्या २१ संचालकांपैकी २० संचालक अविरोध झाले होते. आमदार मनोहरराव नाईक यांचे या सूत गिरणीवर वर्चस्व आहे. मात्र एका जागेसाठी ही निवडणूक झाली. रविवारी पुसदच्या शेतकरी निवास सभागृहात मतमोजणी झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे आप्पाराव घुक्से विजयी झाले. भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे हे महागाव तालुक्यातील मोहदीचे रहिवासी असून सध्या पुसदमध्ये वास्तव्यास आहे. या निवडणुकीत त्यांना केवळ ८७ मते मिळाल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपाचा तालुकाध्यक्ष पराभूत झाल्याने आजही पुसदमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे या निवडणुकीने सिद्ध झाले आहे. आता या निवडणुकीचे कवित्व काही दिवस सुरु राहणार आहे. (लोकमत चमू)