शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

शिवसैनिकांवर भाजपा उमेदवाराचा हल्ला

By admin | Updated: February 17, 2017 02:27 IST

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे समर्थक शिवसैनिकावर भाजपा उमेदवाराने हल्ला केल्याची घटना जिल्हा परिषद निवडणूक मतदानादरम्यान

दिग्रस तालुक्यात निवडणूकीला गालबोट : एक गंभीर जखमी, परस्परांविरुद्ध तक्रारीदिग्रस : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे समर्थक शिवसैनिकावर भाजपा उमेदवाराने हल्ला केल्याची घटना जिल्हा परिषद निवडणूक मतदानादरम्यान तालुक्यातील कळसा येथे घडली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, परस्परविरुद्ध तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील कळसा येथे जिल्हा परिषदेसाठी गुरूवारी मतदान सुरू होते. त्यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे खंदे समर्थक राहुल विठ्ठल शिंदे हे दुर्गामाता मंदिरासमोर उभे होते. त्यावेळी एका वृद्धाने त्यांना नमस्कार केला. त्यावरून भाजपा उमेदवार बाबूसिंग जाधव यांनी त्या वृद्धास उद्देशून शिंदे यांच्याबद्दल असभ्य शब्द वापरले. याचा जाब विचारला असता हाणामारीस सुरूवात झाली. बाबूसिंग जाधव यांचे समर्थक शिंदे यांना काठीने मारहाण करीत होते. त्यावेळी गावातील गजानन साखरकर हा तरूण मधात आला. त्या डोक्याला आणि पाठीला जबर दुखात झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला प्रथम दिग्रस व नंतर यवतमाळ येथे उपचारार्थ हलविण्यात आले. या घटनेची माहिती होताच कळसा येथे एकच गर्दी झाली. पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले. त्याचवेळी माजी राज्यमंत्री संजय देशमुख व माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे यांचे वाहन आले. जमाव त्यांच्या दिशेने धावून जाणार त्यावेळी पोलिसांनी प्रसांगवधान राखल्याने अनर्थ टळला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी दिग्रस गाठून कळसा येथे चोख बंदोबस्त लावला. राहुल शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाबूसिंग तुकाराम जाधव, अरुण जाधव, प्रकाश जाधव, नरेश जाधव, भाऊ जाधव, मिथून राठोड, अनिल जाधव, शेषराव जाधव, प्रदीप जाधव, प्रवीण जाधव, पंजाब जाधव, बाबाराव जाधव यांच्याविरुद्ध तर बाबूसिंग जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल शिंदे, राजू शिंदे, गोपाल शिंदे, नामदेव शिंदे, नरेंद्र शिंदे, भीमराव जाधव, अरुण महिंदे्र, युवराज जाधव, रवींद्र पाटे, अच्चुत महिंदे, सुरेश खुळे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने कळसा येथे काही काळ तणाव निर्माण झाल होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. (शहर प्रतिनिधी)