शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणातूनच ठरणार भाजपाचे उमेदवार

By admin | Updated: July 5, 2014 23:48 IST

विधानसभेसाठी भाजपाकडून सर्वेक्षण होत असून त्यात नाव आले तरच उमेदवारीचा विचार होईल, असे नेत्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा : उमेदवारीसाठी शिष्टमंडळ भेटीला मनाई यवतमाळ : विधानसभेसाठी भाजपाकडून सर्वेक्षण होत असून त्यात नाव आले तरच उमेदवारीचा विचार होईल, असे नेत्यांनी स्पष्ट केले. भाजपाची दोन दिवसीय राज्य बैठक मुंबईत झाली. त्यासाठी जिल्हाभरातून पदाधिकारी गेले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने अधिकाधिक पदाधिकाऱ्यांची आपल्या वाहनात जुळवाजुळव करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही केला गेला. काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी खिळखिळे करण्यासाठी पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांकरिता भाजपाचे दरवाजे खुले करण्याचे ठरले. सत्ता हे मुख्य टार्गेट ठेवण्यात आल्याने जो येईल त्याला भाजपात सामावून घेतले जाणार आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी शिष्टमंडळांनी नेत्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी स्पष्ट शब्दात मनाई करण्यात आली. वैयक्तिक भेटीसाठी मात्र नेत्यांचे दरवाजे खुले ठेवण्यात आले होते. विधानसभेसाठी प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण केले जाईल, त्या सर्वेक्षणात नाव आले तरच उमेदवारीचा विचार होईल, असे पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रुढी यांनी सांगितले. त्याचवेळी हे सर्वेक्षण मॅनेज नको असा सूरही कार्यकर्त्यांमधून उमटला. यावेळी केवळ राज्याचेच नव्हे तर राष्ट्रीय भाजपाकडूनही सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी सर्वेक्षणातून टॉपर राहणे हाच एक पर्याय शिल्लक आहे. शिवाय पक्षाच्या खासदाराचा शब्दही उमेदवारीसाठी प्रमाण मानला जाणार आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षणासाठी चार नावे निवडली गेली आहे. त्या प्रत्येकाच्या सर्व पैलूंचे सर्वेक्षण केले जाईल. अनेक इच्छुकांनी आपल्या गॉडफादर मार्फत आतापासूनच उमेदवारीसाठी लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘आधी सर्वेक्षणात नाव येऊ द्या, मग पाहू’ एवढाच शब्द नेत्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)