शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बिरसा पर्वात चार ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 21:43 IST

येथील समता मैदानात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वात चार ठराव पारित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,.....

ठळक मुद्देसमता मैदानात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वात चार ठराव पारित करण्यात आले.

यवतमाळ : येथील समता मैदानात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वात चार ठराव पारित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, आदिवासी महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जावे आदी ठरावांचा यामध्ये समावेश आहे.समारोपीय कार्यक्रमाच्या उद्घाटक राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष खासदार अनुसयाताई उईके होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इवनाते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त नरेंद्र पोयाम, भारतीय आदिवासी एकता परिषदेचे गुजरातचे अध्यक्ष अशोक चौधरी, प्रा. हमराज उईके, साहित्यिक बाबाराव मडावी, आदिवासी विकास मंडळाच्या संचालिका मिनाक्षी वेट्टी, बिरसा पर्वाचे अध्यक्ष राजू चांदेकर, पुष्पाताई आत्राम, किरण कुमरे उपस्थित होते.खासदार अनुसयाताई उईके म्हणाल्या, आदिवासी समाजाच्या उत्थानाकरिता दरवर्षी कोट्यवधी रूपयांच्या योजना हाती घेतल्या जातात. मात्र, आदिवासी बांधवांपर्यंत योजना पोहोचतच नाही. अजूनही शुद्ध पाणी गावांपर्यंत पोहोचले नाही. आठ राज्यांच्या दौºयातून हे वास्तव पुढे आले आहे. आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आयोग करत आहे. आयोगाच्या उपाध्यक्षपदावर निवड झाल्यापासून आठ राज्यांचा दौरा केला. या दौºयादरम्यान आदिवासी समाजातील वस्त्यांचे चित्र भयंकर होते. मध्य प्रदेशमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये शुद्ध पाणी मिळत नाही. यासर्व विषयात आयोगाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारला. तीन दिवसात या ठिकाणचा प्रश्न सुटला. इतरही राज्यांमध्ये आदिवासी बांधवांची स्थिती अशीच चिंताजनक आहे. आदिवासी बांधवांवर अन्याय होतो, त्यांनी खचून न जाता राष्ट्रीय आयोगाचा दरवाजा ठोठावा, असे त्या म्हणाल्या.भारतीय आदिवासी एकता परिषदेचे गुजरातचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक किशोर उईके यांनी केले. संचालन हिरा धुर्वे यांनी केले. प्रफुल्ल आडे, शैलेश गाडेकर, रेखा कन्नाके, बंडू मसराम, राजू केराम, कृष्णा पुसनाके उपस्थित होते.चार ठरावांना मंजुरी६ जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लोकप्रतिनिधींनी पावले उचलावी. सरकारने कारवाई करावी, संविधानात आदिवासी बांधवांना दिलेल्या हक्कांचे पालन व्हावे, आदिवासी महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यात यावे, आदिवासी समाज बांधवांचा जल, जमीन आणि जंगल सुनिश्चित करून सन्मान करण्यात यावा या चार ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.