शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बिरसा मुंडा जयंती

By admin | Updated: November 16, 2015 02:24 IST

आदिवासी समाजाचे आद्यप्रवर्तक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती शनिवारी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

पुसद : आदिवासी समाजाचे आद्यप्रवर्तक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती शनिवारी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीला शिवाजी चौकात आमदार मनोहरराव नाईक व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी पिवळी झेंडी दाखवून सुरूवात केली. तत्पूर्वी सर्व मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ही मिरवणूक सुभाष चौक, नगिना चौक, गांधी चौक या मार्गे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप झाला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, आदिवासी समाजसेवी माधवराव वंजारे, मुख्याधिकारी अजय कुरवाडे, परंशराम डवरे, गणेश इंगळे, अरुण कळंबे, आशा पांडे, शरद मैंद, सतीश बयास, डॉ. मोहम्मद नदीम, डॉ. अकिल मेमन, महेश खडसे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, सखाराम इंगळे आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी) हिवरी येथे बिरसा मुंडा जयंती हिवरी : यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे महानायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४० वी जयंती शनिवारी हेडंबादेवी समोरील मैदानात उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश सचिव, साहित्यिक दशरथ मडावी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मदन येरावार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष किरण कुमरे, गुलाबराव कुडमते, पवन आत्राम, अरविंद मुडमते, सुरेश कनाके, विजय मुंधडा, शंकरराव कुमरे, नामदेव कोडापे, रमेश भिसनकर, सरपंच सुवर्णा कुमरे, वाटखेडचे सरपंच राहुल पारधी, आनंद मडावी, पोलीस पाटील दिगांबर शहारे, गजानन शहारे आदींची उपस्थिती होती. यावेळी बिरसा मुंडा यांच्या फलकाचे अनावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ढेमसा नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मोहन सिडाम, अंकुश मेश्राम, काशिनाथ कुमरे, रामप्रसाद मडावी, अक्षय कुमरे, अभिजित पेंदोर, निलेश जुमनाके, दीपक येरमे, प्रवीण कुमरे, अजय शहारे, पद्माकर शहारे, अमोल महेर, अंबादास कुमरे आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)