शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पिरंजी येथे बळीराज चेतना अभियान

By admin | Updated: September 15, 2015 05:15 IST

जिल्हा प्रशासनाच्यावतीने उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथे सोमवारी बळीराज चेतना अभियान राबविण्यात येऊन

उमरखेड : जिल्हा प्रशासनाच्यावतीने उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथे सोमवारी बळीराज चेतना अभियान राबविण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी महसूल अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिरंजी येथे सकाळी ९.३० वाजता गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थी शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी लेझीमसह सहभाग घेतला. गावातील महिला डोक्यावर कळस घेऊन यामध्ये सहभागी झाल्या होत्या. गावातील दिलीप मुरमुरे यांनी आपली सजविलेली बैलगाडी प्रभातफेरीसाठी आणली होती. ही बैलगाडी नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. गावातील अनेक मंडळांनी प्रभातफेरी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. पुजाराम सूर्यवंशी यांनी संत गाडगेबाबांच्या भूमिकेत गावकऱ्यांना मार्गदर्शन करून स्वच्छता अभियानाचे महत्व पटवून दिले. ही प्रभातफेरी हनुमान मंदिरावर पोहोचली. त्याठिकाणी प्रभातफेरीचे रुपांतर सभेत झाले. उमरखेडचे तहसीलदार सचिन शेजाळ, मंडळ अधिकारी राम पंडीत, तलाठी गजानन सुरोशे, अमोल पातुरकर, दत्तात्रय दुर्लेवार, कृषी विभागाचे कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कीर्तनकार नागोराव मुळे महाराज यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी गणेश महाराज, दादाराव महाराज, मारोतराव चव्हाण, नत्थुजी महाराज आदींची उपस्थिती होती. अभियानासाठी सरपंच अरुणा पाईकराव, कानबा भुसाळे, साहेबराव भावाळ, गणेश काळे, श्यामराव नखाते आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)