शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महागाव तालुक्यातच विजेचा सर्वाधिक प्रकोप

By admin | Updated: August 31, 2014 00:07 IST

महागाव तालुक्यात २१ ते २९ आॅगस्ट दरम्यान एकाच आठवड्यात तालुक्यातील विविध भागात पडलेल्या विजेमुळे पाच लोकांना प्राण गमवावा लागला तसेच पाच जनावरांचा मृत्यू झाला.

महागाव : महागाव तालुक्यात २१ ते २९ आॅगस्ट दरम्यान एकाच आठवड्यात तालुक्यातील विविध भागात पडलेल्या विजेमुळे पाच लोकांना प्राण गमवावा लागला तसेच पाच जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक जण गंभीर जखमीसुद्धा झाले. काहींना कायमचे अपंगत्व आले. विजेचा प्रकोप तालुक्यावर जरा जास्त असल्याचे आतापर्यंतच्या पाहणीतून आढळून आले. हवामान खात्याने यापूर्वी तालुक्यात वीज पडण्याची शक्यता २१ आॅगस्ट रोजी वर्तविली होती. त्याच दिवशी उपजिल्हाधिकारी खवले यांनी तसे मोबाईलवर मॅसेज पाठविले होते. परंतु उपजिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याकडे महागाव तहसील कार्यालयाने दुर्लक्ष केले. कुठेही सर्तकतेचा इशारा स्थानिक प्रशासनाच्यावतीने देण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याच दिवशी करंजखेड येथे वीज पडून दोन जण, तर टेंभी येथे एका जनावराचा मृत्यु झाला. यामध्ये अन्य सहा जण जखमी झाले. विशेष म्हणजे त्याच दिवशी काही वेळाने करंजखेड येथेच पुन्हा वीज पडली. २९ आॅगस्टला मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर दुसरीकडे सततच्या वीज पडण्यामुळे होणाऱ्या प्राणहाणीमुळे भितीचे वातावरण आहे. २९ आॅगस्ट रोजी वरोडी येथे विजय पडली. शेतातून घरी परतत असताना सहा महिला या विजेच्या प्रकोपाच्या शिकार झाल्या. त्यामध्ये छाया अनंता अडकिणे (३५) हिचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर सुनीता किशोर तिगडवाड, रत्नाबाई अशोक अडकिणे, संध्या अनिल जाधव या महिला गंभीर जखमी झाल्या. त्याच दरम्यान महागाव येथील आठवडी बाजारात असलेल्या अनिल मामीडवार यांच्या घरावर वीज पडली. यामध्ये घराचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही प्राणहाणी झाली नाही. शहरात वीज पडण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे नागरिकांनी सांगितले. शुक्रवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने मोठी प्राणहाणी होऊ शकली असती. यावेळी काही काळ मोठी धावपळ उडाली होती. स्थानिक तहसील कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग कमालीचा गाफील आहे. याविभागात काम करणाऱ्या कर्मचारी कायम मोबाईल बंद करून असतात. विभागाची माहिती तहसीलदारांनासुद्धा नसते. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे व्यवस्थापन करण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)