शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मरणाऱ्यापेक्षा तारणारा ठरला मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:30 IST

मारणाऱ्या किंवा मरणाऱ्यापेक्षा नेहमीच तारणारा मोठा ठरतो. त्याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आला. शुक्रवारी दुपारची सुनसान वेळ. मधल्या सुटीतून एक विद्यार्थिनी शिक्षकांना पोटदुखीचे कारण सांगून घराकडे जात होती. तिने सायकल व दप्तर शिक्षक कॉलनीतील विहिरीच्या बाजूला ठेवले आणि क्षणार्धात तिने विहिरीत उडी मारली. हा प्रकार दुसऱ्यां छोट्या मुलाने पाहिला.

ठळक मुद्देउमरखेडची थरारक घटना : वाहतूक पोलिसाची कामगिरी, विद्यार्थ्याने दाखविले प्रसंगावधान

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : मारणाऱ्या किंवा मरणाऱ्यापेक्षा नेहमीच तारणारा मोठा ठरतो. त्याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आला.शुक्रवारी दुपारची सुनसान वेळ. मधल्या सुटीतून एक विद्यार्थिनी शिक्षकांना पोटदुखीचे कारण सांगून घराकडे जात होती. तिने सायकल व दप्तर शिक्षक कॉलनीतील विहिरीच्या बाजूला ठेवले आणि क्षणार्धात तिने विहिरीत उडी मारली. हा प्रकार दुसऱ्यां छोट्या मुलाने पाहिला. त्याने लगेच विनोद सुंदरसिंग जाधव या वाहतूक पोलिसाला फोन केला. विनोद त्वरित विहिरीवर आला अन् त्याने कोणताही विचार न करता विहिरीत उडी घेतली. विनोदने त्या तरुण विद्यार्थिनीचे प्राण वाचविले यातून मरणाºयापेक्षा वाचविणारा मोठा ठरल्याचा प्रत्यय नागरिकांना आला.शहरातील एका प्रसिद्ध शाळेत दहावीत शिकणारी ही विद्यार्थिनी होती. वाहतूक पोलीस शिपाई विनोदने आपल्या प्राणाची बाजी लावून तिला जीवदान दिले. यातून विनोदने ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रिद खरे ठरविले. त्याला बोरबन येथील रीक्षा चालक मारोती वाघमारे यानेही मदत केली. त्यानेही तरुणीचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली.पोलिसांबद्दल सतत उलटसुलट चर्चा होतात. मात्र विनोदच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले. पालिकेची अग्निशमन यंत्रणा घेऊन नगराध्यक्ष नामदेव ससाणे, उपाध्यक्ष अरविंद भोयर यांनीही लगेच घटनास्थळ गाठले. अग्नीशमन यंत्रणेत व्ही.व्ही. शिंदे, फायरमन संजय पवार, अनिल काळबांडे, अब्दुल वाजीद, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले, बीट जमादार रोशन सरनाईक, शिपाई बंडकर यांनीही घटनास्थळ गाठून बाहेर काढलेल्या तरूणीला शासकीय रुग्णालयात दाखल केले.विहिरीला जाळी लावलीच नाहीशहरात पाणीटंचाई असताना अबरार-मामीडवार लेआऊटमधील शिक्षक कॉलनीत या विहिरीला वर्षभर पाणी असते. या विहिरीत यापूर्वी एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्यामुळे विहिरीची डागडुजी करून जाळी लावण्याची मागणी नगरसेविका सविता पाचकोरे, गजेंद्र ठाकरे यांनी केली होती. त्यांनी सभागृहात ही समस्या मांडली. मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही. रविवारी घडलेल्या या घटनेने पाणी पुरवठा सभापती दिलीप सुरते यांनी येत्या आठ दिवसांत प्रश्न निकाली काढू, असे सांगितले.