शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

तिवरीत शेतीच्या वादातून मोठ्या भावाचा खून

By admin | Updated: June 4, 2017 01:09 IST

तालुक्यातील तिवरी येथे शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार हत्याराने खून केला.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील तिवरी येथे शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार हत्याराने खून केला. भावजयीवरही हल्ला करून तिला जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. रमेश हरसिंग पवार (४५), असे मृताचे नाव आहे. रमेश पवार आणि त्यांचा लहान भाऊ विलास हरसिंग पवार (३८) यांच्यात दोन एकर शेतीचा वाद होता. शुक्रवारी रात्री पुन्हा शेतीवरून दोघांत वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रमेशला शिवीगाळ करीत लहान भाऊ विलास त्यांच्या अंगावर धावून गेला. रमेशची पत्नी सविता मधात आली असता तिला विलासने मारहाण करीत ढकलून दिले. नंतर विलासने घरातील धारधार हत्यार आणून अंगणात उभ्या असलेल्या रमेशला खाली पाडून त्याच्यावर सपासप वार केले. यात रमेश पवार जागीच ठार झाला. नंतर विलास तेथून पळून गेला. याप्रकरणी मृत रमेश पवार यांची बहीण संतूबाई अजाबराव राठोड यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शनिवारी सकाळी १० वाजता आरोपी विलास पवार याला साखरा शिवारातून अटक केली. तत्पूर्वी घटनास्थळाला दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. ललित पांडे, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे आदींनी भेट दिली.