शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

जुळ्या भावांपैकी करणला आदिलाबाद येथे कामासाठी का पाठविले असा प्रश्न गुरुवारी रात्री अर्जुनने मोठा भाऊ गोपाल यास विचारला. यावेळी गोपाल हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होता. अर्जुनने विचारलेल्या प्रश्नाकडे गोपालचे लक्षच नव्हते. मात्र आपल्या प्रश्नाला गोपाल प्रतिसाद देत नाही असा गैरसमज झाल्याने रागाच्या भरात अर्जुनने गोपालवर लोखंडी पाईपने हल्ला चढविला.

ठळक मुद्देचिल्ली इजारातील घटना : लोखंडी पाईपचा वापर, आरोपी फरार, जंगलात शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : घरगुती क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा लोखंडी पाईपने हल्ला चढवून निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील चिल्ली इजारा या गावात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.गोपाल पांडुरंग राठोड असे मृताचे नाव आहे. महागावपासून १३ किलोमीटर अंतरावर चिल्ली इजारा येथे गोपालचे आईसह चार जणांचे कुटुंब आहे. त्यात तीन भावंडे आहेत. त्यापैकी करण-अर्जुन हे दोघे जुळे आहेत. एक विवाहित बहीण आदिलाबादला राहते. जुळ्या भावांपैकी करणला आदिलाबाद येथे कामासाठी का पाठविले असा प्रश्न गुरुवारी रात्री अर्जुनने मोठा भाऊ गोपाल यास विचारला. यावेळी गोपाल हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होता. अर्जुनने विचारलेल्या प्रश्नाकडे गोपालचे लक्षच नव्हते. मात्र आपल्या प्रश्नाला गोपाल प्रतिसाद देत नाही असा गैरसमज झाल्याने रागाच्या भरात अर्जुनने गोपालवर लोखंडी पाईपने हल्ला चढविला. यात गोपालचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पाटील राजू राठोड यांनी घटनेची माहिती महागाव पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्रीच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसदला रवाना केला. आरोपी अर्जुन याने घटनेनंतर पोबारा केला. गोपालच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला होता. मृतक गोपाल हा घरातील कमावता व्यक्ती होता. त्याच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. करण व अर्जुन यांना नृत्य व अभिनयाची आवड आहे. हा छंद जोपाण्यासाठी ते काही दिवसापूर्वी पुणे येथे गेले होते. मात्र संधी न मिळाल्याने ते गावात परतले. मात्र ते कुठेच काम करीत नसल्याने गोपालचा नेहमीच वैताग व्हायचा, त्यातूनच त्याने करणला रोजगार शोधण्यासाठी पाठविले होते.मात्र हेच कारण गोपालच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले. या घटनेचा तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनात महागावचे ठाणेदार दामोधर राठोड, बीट जमादार माणिक पवार करीत आहे. आरोपी अर्जुन हा लगतच्या जंगलात लपून बसला असावा असा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी त्याची शोधमोहीम चालविली आहे.

टॅग्स :Murderखून