शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शेतकऱ्यांसाठीच भाऊसाहेबांचा लढा

By admin | Updated: December 27, 2015 02:48 IST

शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रातच नव्हेतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला.

प्रवीण भोयर : नेर येथे जयंती उत्सव व स्नेहसंमेलननेर : शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रातच नव्हेतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला. भारतातील शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेत जगत आहे. येथील व्यवस्थेने त्याचे अतोनात शोषण केले. हे जाणून भाऊसाहेबांनी वैश्विक दृष्टिकोन ठेवून जगातील शेतकरी सुखी व्हावा, यासाठी लढा दिला, असे प्रतिपादन प्रा.प्रवीण भोयर यांनी केले. स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख जयंती उत्सव व स्रेहसंमेलनात प्रमुख वक्ते म्हणून प्रा.भोयर बोलत होते. भाऊसाहेब हे दूरदृष्टीचे सामाजिक जाण व भान असलेले नेते होते. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी जागतिक स्तरावर कृषी प्रदर्शन आयोजित केले व महासत्ता असलेल्या राष्ट्रप्रमुखांना एकत्र आणून सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण संस्थांची स्थापना, देवस्थान बिल, डॉ.आंबेडकरांच्या आवाहनावरून अंबादेवी मंदिर मुक्ती लढा असे उत्तुंग कार्य भाऊसाहेबांनी केले, असे प्रा.भोयर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबू पाटील जैत होते. शेतकऱ्यांनी एकत्र येवून लढा देणे गरजेचे आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे हीच भाऊसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मनोगत जैत यांनी व्यक्त केले. विचारपीठावर नगराध्यक्ष पवन जयस्वाल, संजय वानखडे, मधुकरराव बोबडे, उत्तमराव ठाकरे, सुधीर माळवे, सुभाष ठाकरे, अनिल मिसाळ, कमलेश चरडे, तेजस नाव्हे, आकांक्षा जुमळे उपस्थित होते. यावेळी शालांत परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. विज्ञान प्रदर्शन, पाककला प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रशेखर आगलावे तर सूत्रसंचालन गिरीश कनाके यांनी केले. आभार किशोर चव्हाण यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)