शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यात लाखोंनी गंडा घालणारे भामटे

By admin | Updated: May 31, 2014 23:47 IST

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे भामटे तालुक्यात सक्रिय झाले आहेत. आतापर्यंत अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या भामट्यांनी लाखो रुपयांनी गंडविले आहे.

नरेश मानकर - पांढरकवडानोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे भामटे तालुक्यात सक्रिय झाले आहेत. आतापर्यंत अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या भामट्यांनी लाखो रुपयांनी गंडविले आहे.बेकारीचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारांना नोकर्‍या मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. नोकरी मिळविण्यसाठी सुशिक्षित बेरोजगार व त्यांचे पालक कितीही पैसे मोजायला तयार असतात. याचाच फायदा लाटणारे अनेक जण सध्या तालुक्यात सक्रिय झाले आहे. नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांनी लुटणार्‍या या लुटारुंमध्ये काही राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे. सध्या अशा बेरोजगार युवकांना हेरुन त्यांना गंडविणारी भामट्यांची टोळीच तालुक्यात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यात अनेक संधीसाधूंनी रोजगाराचा बाजारच मांडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भामट्यांचे दलाल ठिकठिकाणी जाऊन सुशिक्षित बेरोजगारांना हेरतात. काही भामटे तर शहरातील एखादा भामटा पकडून त्याच्याकडून बेरोजगारांची माहिती मिळवितात. त्याला विशिष्ट ठिकाणी घेऊन जातात. त्याला नोकरीचे आमिष दाखऊन त्याच्याकडून लाखो रुपये उकळतात. हे भामटे त्या सुशिक्षित बेरोजगारावर अशाप्रकारे छाप टाकतात, की तो भामट्याला पैसे देण्यास बळी पडतोच. घरचे दागदागिने विकून, कर्ज काढून त्या भामट्यांना पैसे दिले जाते. पैसे देताना आपण फसविले जात आहो, याची बेरोजगारांना साधी कल्पनाही नसते. शहराबरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांचीही नोकरीसाठी भटकंती होत आहे. अनेक अडचणींवर मात करीत विद्यार्थी पदवीधर होतात. पदवीनंतर नोकरी मिळविण्यासाठी तरुणांचा संघर्ष सुरु होतो. पदवी कोणतीही असो, नोकरी कोणत्याही क्षेत्रातील असो, अर्जदार हजारावर असतात. ही स्थिती सर्वत्र दिसत आहे. तालुक्यात याचे प्रमाण अधिकच आहे. नोकरी नसल्याचे शल्य उराशी बाळगून सुशिक्षित तरुण नोकरीसाठी फिरताना दिसतात. यातून नैराश्य येऊन अनेकांनी पर्यायी मार्ग स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. याचाच फायदा दलाल घेत आहे. त्यामुळे नोकरीचे भावही वधारले आहेत.सुशिक्षित बेरोजगारांच्या मानसिकतेचा फायदा घेत संधीसाधूंनी अनेकांकडून मोठय़ा रकमा उकळलेल्या आहेत. परंतु नोकरीचा पत्ता नाही. पुढील महिन्यात नोकरीचा आदेश घरपोच येईल, असे सांगून हे भामटे वेळ मारुन नेत आहे. परंतु कित्येक महिने उलटूनही नोकरी मिळत नसल्याचे पाहुन अनेकांनी या भामट्यांना पैसे परत करण्याचा आग्रह धरला आहे. परंतु हे भामटे पैसे परत द्यायला तयार नाहीत. काही भामट्यांचा तर ठावठिकाणाही नाही. फसवणूक झालेल्या काही जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची तयारीही केली. परंतु थोडे दिवस थांबा, लवकरच नोकरीचा आदेश तुम्हाला घरपोच येईल, आतापर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होती, आता शिक्षक मतदार संघाची निवडणुकीची आचारसंहिता आहे, असे सांगून हे भामटे सुशिक्षित बेरोजगारांच्या पैशावर मजा मारत आहेत. कित्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या सुखासाठी आयुष्याची कमाई खर्ची घातली. मात्र पदवीच्या प्रमाणपत्रासह लाखो रुपये देऊनही नोकरी मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीचा लाभ काही चाणाक्ष भामट्यांनी घेतला आहे. बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत त्यांच्याकडून पैसे  उकळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. बेरोजगारांच्या पैशावर मौज करीत राजकीय पक्षांची पदे कॅश करणारे काही युवकही कार्यरत आहेत. तालुक्यात आतापर्यंत अनेक सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाली आहे. युवकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनीही याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.