शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

विधानसभेसाठी वणीत उमेदवारांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:31 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात उमेदवारांची सर्वाधिक भाऊगर्दी वणी मतदारसंघात पहायला मिळणार आहे. तेथे पंचरंगी सामना होऊ शकतो. मुळात प्रमुख पक्षातच नियोजित उमेदवाराशिवाय इतर अनेक सक्षम चेहरे असल्याने उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होणार आहे.

ठळक मुद्देयुती-आघाडीचा संभ्रम : सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची रस्सीखेच

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात उमेदवारांची सर्वाधिक भाऊगर्दी वणी मतदारसंघात पहायला मिळणार आहे. तेथे पंचरंगी सामना होऊ शकतो. मुळात प्रमुख पक्षातच नियोजित उमेदवाराशिवाय इतर अनेक सक्षम चेहरे असल्याने उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होणार आहे.वणी विधानसभा मतदारसंघात उमेदवार भाजपचा की शिवसेनेचा आणि काँग्रेसचा की राष्टÑवादीचा असा पेच युती व आघाडीत निर्माण होणार आहे. कारण वणीमध्ये २०१४ ला पहिल्यांदाच भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार अनपेक्षितपणे निवडून आले. त्यापूर्वी ही जागा वामनराव कासावार यांच्या रुपाने काँग्रेसकडे होती. २००९ मध्ये या जागेवर शिवसेनेचे विश्वास नांदेकर निवडून आले होते. या मतदारसंघात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाचे सक्षम उमेदवार आहेत. मात्र युती झाल्यास ही जागा भाजपला की सेनेला असा प्रश्न निर्माण होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आमदाराला पक्षाचे उमेदवार हंसराज अहीर यांना मतांची अपेक्षित आघाडी मिळवून देता आली नाही. अवघ्या दोन हजार मतांची आघाडी मिळाल्याने भाजप आणि विशेषत: अहीर समर्थकांच्या दुसऱ्या गटात आमदारांबाबत नाराजी आहे. त्यातूनच बोदकूरवार यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध व आव्हान देखील दिले जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाने ही जागा तरुण उमेदवारासाठी पक्षाकडे मागितली आहे. एकूणच बोदकुरवारांना ‘सिटींग-गेटींग’ या एकमेव फॉर्म्युलावर पुन्हा उमेदवारी मिळविणे सोपे नाही. मात्र माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा शब्द आपल्या समर्थक व इच्छुकांपैकी कुणाच्या पारड्यात पडतो यावरही भाजपच्या तिकिटाचे गणित अवलंबून आहे. शिवसेनेतसुद्धा गटबाजी असून नांदेकरांशिवाय आणखी काही चेहरे तयारीला लागले आहेत. सेनेनेही युतीच्या वाटाघाटीत या मतदारसंघावर जोरदार दावा सांगितला आहे.इकडे काँग्रेस व राष्टÑवादीतसुद्धा तिकिटासाठी जोरदार स्पर्धा आहे. काँग्रेसकडून परंपरागत उमेदवार वामनराव कासावाराांशिवाय अनेक नवे चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. वामनरावांना घरातूनही स्पर्धक आणि पर्याय तयार झाले आहेत.राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर चंद्रपुरातून निवडून आले. त्यांचा शब्दही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कुण्यातरी पक्षात एन्ट्री करण्याची संधी शोधणाºया एका सोबर चेहºयाला खासदारांनी थेट बारामतीत प्रोजेक्ट करून त्यांचे आत्ताच ‘कन्सेन्ट’ मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. विधानसभेच्या तिकिटाच्या कमिटमेन्टवर त्या नेत्याची काँग्रेसमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु काँग्रेसमधून त्यांना विरोध होतो आहे. काँग्रेसमध्ये तिकिटासाठी स्पर्धा वाढणार आहे. राष्टÑवादी काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून व पक्षातील एका ज्येष्ठ आक्रमक नेत्याच्या मैत्रीच्या बळावर हा मतदारसंघ राष्टÑवादीसाठी सोडवून घेण्याचा इच्छुकाचा प्रयत्न आहे.वणी विधानसभा मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या भक्कम समजला जातो. कोळशाचा काळाबाजार, त्यातील वाहतूक, चोरटी विक्री व एकूणच उलाढालीतील पैसा विधानसभेत पाण्यासारखा खर्च केला जातो. आजच्या घडीला सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी या पैशाच्या जोरावरच विधानसभेचा गड काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. आपल्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी ही सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. युती व आघाडी झाल्यास वर्चस्वाच्या राजकीय लढाईतून पाडापाडी होण्याची चिन्हे वणी विधानसभा मतदारसंघातही आहे. निवडणुका स्वबळावर लढायच्या की युती, आघाडीत हे निश्चित झाल्यानंतरच इच्छुक उमेदवारांना पुढील दिशा स्पष्ट होईल, एवढे निश्चित.मनसे, प्रहारचेही आव्हानप्रमुख चार पक्षांशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही वणी मतदारसंघात बºयापैकी ताकद आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांपुढे मनसेचेही आव्हान राहणार आहे. युती व आघाडी न झाल्यास वणी मतदारसंघात आधीच पंचरंगी लढतीचे चित्र असताना आता त्यात प्रहारचीही भर पडणार आहे. प्रहारमधूनही विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.