शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

उत्तम पशुधन हीच शेतकऱ्यांची पुंजी

By admin | Updated: February 27, 2016 02:54 IST

पूर्वी पशु आणि पक्षीपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा होता. नजीकच्या काळात शेतकऱ्यांचे जोडधंद्याकडे दुर्लक्ष झाले.

पालकमंत्री : कळंब येथे पशु प्रदर्शन, उन्नतीसाठी जोडधंद्याशिवाय पर्याय नाहीकळंब : पूर्वी पशु आणि पक्षीपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा होता. नजीकच्या काळात शेतकऱ्यांचे जोडधंद्याकडे दुर्लक्ष झाले. शेतकरी वर्गाला आर्थिक उन्नती साधायची असेल तर जोडधंद्याशिवाय पर्याय नाही. उत्तम पशुधन हीच तर खरी शेतकऱ्यांची पुंजी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. येथील पशुप्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती वर्षा वासेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, तहसीलदार संतोष काकडे, उपसभापती विजय गेडाम, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, उपनगराध्यक्ष मनोज काळे, पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी, जिल्हा पशुधन उपायुक्त डॉ.किशोर कुंभरे, जिल्हा पुशधन अधीक्षक डॉ.दिलीप सोनकुसळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, २०१९ पर्यंत सर्व गावात जलयुक्त शिवार योजना राबविली जाणार आहे. पर्यायाने सर्व गावात शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. प्रलंबित वीज कनेक्शन तातडीने जोडले जाईल. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आलेल्या आहे. त्याचा फायदा उचलला पाहिजे.सीईओ डॉ.कलशेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. पशु प्रदर्शन हा त्याचाच एक भाग आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविधांगी प्रयोग केले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्राला ९० टक्केपर्यंत प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला बांधकाम सभापती आशिष धोबे, आरोग्य सभापती सुनीता डेगमवार, उपसभापती शैलजा उमरतकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, नगरसेवक मारोती वानखेडे, राजेंद्र हारगुडे, वैशाली नवाडे, विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख रोशन गोरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पशुधन विकास अधिकारी डॉ.रवींद्र मांडेकर यांनी केले. संचालन व आभार सुरेश कठाळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)