शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बेलोराचा ‘तो’ डॉक्टर अद्याप चौकशीतच

By admin | Updated: January 25, 2017 00:14 IST

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेदरम्यान तीन महिलांचे आतडे कापणाऱ्या डॉक्टरवर तत्काळ कारवाई होणार अशी अपेक्षा फोल ठरली

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाप्रकरण : जखमी महिलांना रुग्णालयात संसर्गाचा धोका यवतमाळ : कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेदरम्यान तीन महिलांचे आतडे कापणाऱ्या डॉक्टरवर तत्काळ कारवाई होणार अशी अपेक्षा फोल ठरली असून आठवडाभर या प्रकरणाची चौकशीच चालणार आहे. त्यानंतर ‘त्या’ डॉक्टरवर कारवाई होण्याचे संकेत आहे. तूर्तास दोन महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून त्यांनाही संसर्गाचा धोका वाढला आहे. एकंदर या प्रकरणात प्रशासन बेजबाबदार पणे वागत असून मंत्र्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. पुसद तालुक्यातील बेलोरा आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेदरम्यान तीन महिलांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यापैकी शारदा काळे हिचा मृत्यू झाला. तर अरुणा चव्हाण आणि वंदना देवकते यांची प्रकृती गंभीर झाली. शस्त्रक्रिया करणारे डॉ. स्वप्नील सातपुते यांच्या चुकीमुळे या महिलांचे आतडेच कापल्याचे प्रकरण पुढे आले. गंभीर प्रकार असतानाही प्रशासनाकडून दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याऐवजी केवळ शासकीय सोपस्कार पार पाडले जात आहे. तर दुसरीकडे याच घटनेतील दोन महिलांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्यांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. वंदनाच्या पोटात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर येथे उपचार सुरू आहे. सामान्य माणसाकडून चूक झाल्यास प्रथम कारवाई आणि नंतर चौकशी केली जाते. परंतु येथे डॉक्टर असल्याने नरमाईची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर भोंगाडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील सातपुते दोषी असतानाही त्यांंना अभय दिले जात आहे. आता चौकशी समितीचा अहवाल येण्यास आठवडा लागणार आहे. तोपर्यंत या डॉक्टरांवर कारवाई करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील बेलोरा आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ. स्वप्नील सातुरवार नव्हे तर डॉ. स्वप्नील सातपुते असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)