शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

सदृढ समाज स्वास्थ्यासाठी विजयबाबूंची धडपड प्रेरणादायी

By admin | Updated: September 19, 2016 01:02 IST

समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विजयबाबूंची सुरू असलेली धडपड आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,

मदन येरावार : खासदार विकास निधीतील अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण यवतमाळ : समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विजयबाबूंची सुरू असलेली धडपड आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, सामान्य प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले. विजय दर्डा यांनी स्थानिक खासदार विकास निधीतून येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री मदन येरावार म्हणाले, विजयबाबूंनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा दर्जेदार करण्यावर भर दिला. त्यांच्याच निधीतील रुग्णवाहिका येथे आहे. आता ही अत्याधुनिक रुग्णवाहिका देऊन गोरगरीब रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे. अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण होत आहे. या रुग्णवाहिकेचा उपयोग गोरगरीब रुग्णांसाठीच व्हावा. प्रत्येक रुग्णाला येथे व्हीआयपी ट्रिटमेंट मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुग्णाला नातेवाईक समजून सेवा द्या -विजय दर्डा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणारे रुग्ण हे गोरगरीब असतात. त्यांना आपले नातेवाईक समजून सेवा द्या, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले. सर्व सेवांमध्ये रुग्णसेवा हे महान कार्य आहे. सामान्य रुग्णांचे शासकीय रुग्णालय हेच एकमेव आशास्थान असते. डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहून सेवा द्यावी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेले वैद्यकीय महाविद्यालय स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा तत्कालीन आरोग्य मंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी आणले. त्यासाठी इतरही जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिली. (कार्यालय प्रतिनिधी) बाबूजींच्या पुण्यतिथीदिनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बेरीयाट्रिक सर्जन यवतमाळात सेवा देणार- विजय दर्डा वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शस्त्रक्रिया गृह सुविधांसह उपलब्ध करून दिल्यास स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुण्यतिथीदिनी २५ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बेरीयाट्रिक सर्जन डॉ. मुफझल लकडावाला यांची यवतमाळात नि:शुल्क सेवा देण्याची तयारी विजय दर्डा यांनी रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी बोलून दाखविली. डॉ. लकडावाला यांनी दहा वर्षाआतील शस्त्रक्रियेद्वारे मधुमेह पूर्णत: बरा करण्याचा दावा केला आहे. बेरीयाट्रिक सर्जरीसाठी अडीच ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो, ही महागडी शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना नि:शुल्क करुन दिली जाईल. त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, ना. मदन येरावार आणि अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी सुविधांसह रुग्णालय उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन दर्डा यांनी केले. यावेळी ना. येरावार व डॉ. राठोड यांनी शस्त्रक्रिया शिबिरासाठी सहकार्य देण्याचे मान्य केले.