शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

चक्रवती नदीच्या उत्थानास सुरुवात

By admin | Updated: May 9, 2016 02:29 IST

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चक्रवती नदीच्या उत्थानास शनिवारी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

पुनरुज्जीवन : कळंब येथील नागरिकांनी घेतला पुढाकारकळंब : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चक्रवती नदीच्या उत्थानास शनिवारी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. लोकसहभाग आणि लोकांनी गोळा केलेल्या निधीतून या कामास अगदी ठराविक वेळेवर सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दिगांबर मस्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सदस्य प्रवीण देशमुख, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता काटपल्लीवार, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार संतोष काकडे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, पणन महामंडळाचे संचालक सुरेश चिंचोळकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ.अशोक उईके म्हणाले, या नदीला जिवंत करणे हे माझे स्वप्न आहे. परंतु यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्वाचा आहे. ज्या कामात लोकांचा पुढाकार असतो, ते काम कधीही अयशस्वी होत नाही. त्यामुळे नदीचे पुनरुज्जीवन प्रत्यक्षात साकारले जाईलच, याचा मला ठाम विश्वास आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनीही या चळवळीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत, आपले एक महिन्याचे मानधन जाहीर केले. जिल्हाधिकारी सच्ािंद्र प्रताप सिंह यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.प्रास्ताविकातून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी मांडली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर पडावी, कळंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव जगताप, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, प्रशांत डेहनकर, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कुळकर्णी, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, बांधकाम सभापती आशिष धोबे, आरोग्य सभापती सुनीता डेगमवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनंदा जुमळे, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे, नायब तहसीलदार संजय होटे, राजेश पऊळ, नगरसेवक राजेश मांडवकर, राजेश हारगुडे, वासुदेव दाभेकर, अशोक उमरतकर, मारोती दिवे, अनिल नवाडे, योगेश धांदे, मुरलीधर डेहनकर, भाविक भगत, देवेंद्र जोशी, मारोती वानखडे, हेमंत बोकडे, आर.जी. शिंदे, विजय मेश्राम, राजेश चौधरी, राजाभाऊ तांबेकर, सिध्देश्वर वाघमारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)