शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बी.एड. विद्यार्थ्यांचा उठाव

By admin | Updated: February 7, 2017 01:22 IST

बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी प्राचार्यांविरोधात उठाव केला.

प्राचार्यांविरुद्ध दुजाभावाचा आरोप : महाविद्यालयाबाहेर बसून नोंदविला निषेध यवतमाळ : बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी प्राचार्यांविरोधात उठाव केला. महाविद्यालयाबाहेर बसून विद्यार्थ्यांना निषेध नोंदविला. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.वर्गात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जाणिवपूर्वक गैरहजर दाखविले जाते. काही विद्यार्थ्यांना यातून सुट दिली जाते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. गैरहजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी पत्र पाठविण्याची धमकी दिली जाते, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपित्यांचे चित्र रेखाटण्यावर आक्षेप घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.गैरहजेरी लावण्यासोबतच प्रॅक्टीकलचे गुण कापण्याची धमकी दिली जाते. या संदर्भातील तक्रार पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. सोमवारी आंदोलनात स्वप्नील आंबटकर, सुनील आडे, प्रशांत राठोड, सचिन जाधव, प्रांजली ठाकरे, शितल शर्मा, हुमायू सय्यद यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.या संदर्भात प्राचार्य डॉ.एस.एस. लिंगायत म्हणाल्या, आपण दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला. कामकाजात सुधारणा करण्यास सुरुवात केली. यातून अनेक गैरप्रकार पुढे आले. आणखी गोंधळ उघड होण्याची भीती गैरप्रकार करणाऱ्यांना वाटत आहे. यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना ढाल बनविले. माझे कामकाज विद्यार्थ्यांना आवडत नसेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार आहे. यासोबतच पुराव्यानिशी गैरप्रकार चव्हाट्यावर आणनार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांनी संबंधितांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली आहे. (शहर वार्ताहर)