शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांसाठी व्यापारी ठरले कर्दनकाळ

By admin | Updated: June 4, 2014 00:23 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात व्यापारीच शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ते कुठेही शेतमाल खेरदी करीत असल्याने शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. मात्र बाजार समितीचे त्याकडे

बाजार समितीचे दुर्लक्ष : शेतकर्‍यांना माहितीही मिळत नाहीनीलेश यमसनवार - पाटणबोरीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात व्यापारीच शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ते कुठेही शेतमाल खेरदी करीत असल्याने शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. मात्र बाजार समितीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.येथील उपबाजारात शेड आणि ओट्यांची वानवा आहे. आत्तापर्यंत येथे शेड आणि ओटे बांधण्यात न आल्याने शेतकर्‍यांना आपला शेतमाल कुठे ठेवावा, असा प्रश्न पडतो. सोबतच शेतमालाच्या दरातील चढ-उतार कळत नसल्याने शेतकर्‍यांची नाडवणूक होत आहे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी करंजी, रूंझा, मोहदा आदी ठिकाणी दोन-दोन शेड, ओटे बांधण्यात आले. मात्र लोकसंख्येने तालुक्यात सर्वात मोठे असलेल्या पाटणबोरी येथील उपबाजार समितीत शेड व ओटे आतापर्यंत बांधण्यात आले नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाला येथील उपबाजाराचा विसर पडल्याचे दिसून येते. येथे शेतकर्‍यांना शेतमालाबाबत कोणतीही माहिती विचारायची झाल्यास स्वतंत्र कक्ष नाही. बाजार समितीचा कर्मचारी नाही. कोणत्याही शेतमालाच्या भावात चढ-उतार झाल्यास शेतकर्‍यांना त्याची माहिती मिळत नाही. परिणामी शेतकर्‍यांचे नुकसान होते. त्यांना आंधळेपणाने आपला शेतमाल व्यापार्‍यांच्या घशात घालावा लागतो. व्यापारी बाजार समितीच्या प्रांगणात शेतमालाची खरेदी न करता आपल्या सोयीच्या ठिकाणी करतात. त्यातून शेतकरी नागवला जात आहे. व्यापारीच शेतमालाचा दर ठरवितात. छोट्या शेतकर्‍यांना ते परवडत नाही. मात्र त्यांना आपला शेतमाल दुसरीकडे विकण्यासाठी नेणेही परवडत नाही. त्यामुळे अखेर व्यापारी म्हणेल, त्या भावात त्यांना आपला शेतमाल नाईलाजाने त्यांच्या घशात घालावा लागतो. यात त्यांचे आर्थिक नुकसान होते. मोठे शेतकरी व्यापार्‍यांच्या या धोरणाला कंटाळून आता शेतमाल पाटणबोरीऐवजी पांढरकवडा, हिंगणघाट, आदिलाबाद येथील बाजारपेठेत नेत आहे. त्यामुळे बाजार समितीचे ‘सेस’चेही प्रचंड नुकसान होत आहे.