शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पगारपत्रकाच्या आधारे ९० लाखांचा दावा फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:44 IST

बोगस पगारपत्रक सादर करून ९० लाखांचा अपघातदावा मिळविण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असा आदेश पांढरकवडा येथील न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देअपघात नुकसान भरपाई दावा : पांढरकवडा न्यायालयाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस पगारपत्रक सादर करून ९० लाखांचा अपघातदावा मिळविण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असा आदेश पांढरकवडा येथील न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पांढरकवडा पोलिसांनी चौकशी करून ९० दिवसात अहवाल न्यायालयाला सादर करा, असे या आदेशात म्हटले आहे.केळापूर पंचायत समितीत कार्यरत व्हेटरनरी सुपरवायझर रवींद्र भांडे (३५) यांचा १८ फेब्रुवारी २०१० रोजी करंजी शिवारात अपघाती मृत्यू झाला. मोटरसायकलला ट्रकने मागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांनी नुकसान भरपाईसाठी पांढरकवडा न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्या. आर.एन. जोशी यांच्या न्यायालयात सदर प्रकरण सुनावणीसाठी आले. मृताच्या वारसांनी रवींद्र भांडे यांचे जानेवारी २०१० चे बोगस पगारपत्रक दाखल करून ९० लाख रुपये नुकसान भरपाईची विनंती केली होती. अपघातग्रस्त ट्रक चंद्रपूर येथील अरिहंत ट्रान्सपोर्ट एजन्सीचा होता. या एजन्सीतर्फे न्यायालयात बाजू मांडताना मृताचे जानेवारी २०१० चे पगारपत्रक बनावट असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.न्यायालयात सादर केलेले जानेवारी २०१० चे पगारपत्रक २० हजार ७३१ रुपयांचे होते, तर त्याच महिन्याचा पगार दुसऱ्या पगारपत्रकात १४ हजार ४८६ रुपये दाखविण्यात आला. बोगस पगारपत्रकाची चौकशी करून फौजदारी कारवाईची मागणी ट्रकमालकांतर्फे त्यांच्या वकिलांनी केली. न्यायालयासमोर दाखल झालेले दोन वेगवेगळे पगारपत्रक प्रकरणाची चौकशी करावी, असा आदेश मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाचे सदस्य व जिल्हा न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी दिला. या प्रकरणात अरिहंत एजन्सीची बाजू अ‍ॅड. पी.टी. दर्डा यांनी मांडली.