शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बरलोटा रुग्णालयात तोडफोड, मारहाण

By admin | Updated: October 19, 2015 00:15 IST

महिलेच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी येथील महादेव मंदिर रोडस्थित बरलोटा हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी तोडफोड केली.

महिलेचा मृत्यू : हलगर्जीपणाचा आरोप यवतमाळ : महिलेच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी येथील महादेव मंदिर रोडस्थित बरलोटा हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी तोडफोड केली. यावेळी डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचाही आरोप आहे.डॉ. पीयूष बरलोटा यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी जितेंद्र वीरदंडे, पत्रकार विवेक गावंडेसह पाच ते सात जणांविरुद्ध भादंवि १४३, १४४, १४७, ४२६, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर गावंडे यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली असून डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. मात्र त्यांची तक्रार चौकशीत ठेवण्यात आली आहे. वर्षा सुधीर डंभारे (२५) रा.येळाबारा असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा मृत्यू नागपूर येथे उपचारादरम्यान झाला. आज तिच्या मृतदेहासह नातेवाईक बरलोटा हॉस्पिटलमध्ये धडकले. याप्रकरणी मृताचे पती सुधीर डंभारे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाला चार वर्षे होऊनही मुलबाळ होत नसल्याने त्यांनी डॉ. सुरेखा बरलोटा यांची ट्रिटमेंट घेतली. त्यानंतर दोष दूर होऊन सुधीर यांची पत्नी गर्भवती राहिली. तिला आठ महिने पूर्ण झाले होते. तपासणीसाठी १ आॅक्टोबरला तिला डॉ. बरलोटा यांच्याकडे नेले होते. त्यांनी सोनोग्राफी सांगितली. २ आॅक्टोबरला रिपोर्ट पाहून वर्षाच्या पोटातील पाणी कमी झाले आहे, गर्भाच्या गळ्याला नाळ गुंडाळली असून लगेच सिझर करावे लागेल, असे सांगितले. त्याच दिवशी दुपारी सिझर केले गेले. मात्र दुसऱ्या दिवशीपासून बाळ व बाळंतीण या दोघांचीही प्रकृती बिघडत असल्याचे डॉक्टरने सांगितले. दरम्यान, प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांनी ५ आॅक्टोबर रोजी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नवजात बाळाला खासगी रुग्णालयात ठेऊन वर्षाला नागपूरला हलविले गेले. तेथे उपचारादरम्यान १३ आॅक्टोबरला वर्षाचे निधन झाले. डॉक्टरांनी नागपूरला रुग्ण हलविण्यासाठी स्वत:च २५ हजार व अ‍ॅम्बुलन्स दिली, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप सुधीर डंभारे यांनी केला आहे. यातील नवजात बालिकाही १३ आॅक्टोबर रोजी मरण पावली. याप्रकरणी डॉ. सुरेखा बरलोटा म्हणाल्या, वर्षाच्या सिझरनंतर सर्व काही ठिकठाक होते. मात्र नंतर श्वास घेण्यास त्रास झाल्याने तज्ज्ञांना दाखविण्यात आले. रिस्क नको म्हणून नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. ५ आॅक्टोबरला वर्षाला नागपूरला हलविले गेले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आपल्याशी कोणताही संपर्क साधला नाही. गेल्या १२ दिवसात वर्षावर काय ट्रिटमेंट करण्यात आली, याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचा माझ्यावर दोष कसा, असा प्रश्नही डॉ. सुरेखा यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)