शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

३३३ दुकानांमधून दारूविक्री बंद

By admin | Updated: April 2, 2017 00:18 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ३३३ दुकानांमधून होणारी दारूविक्री

एक्साईजची कारवाई : गोदामांना ठोकले सील, सर्वाधिक वणी-पुसद यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ३३३ दुकानांमधून होणारी दारूविक्री शनिवार १ एप्रिलपासून बंद झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सकाळपासूनच या दुकानांना सील ठोकण्याची मोहीम हाती घेतली होती. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने अपघाताच्या वाढत्या घटनांना महामार्गावर होणारी दारू विक्री जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महामार्गावरील दारूची ही सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून जिल्ह्यात सुरू झाली. जिल्ह्यात देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने, बीअर शॉपी, वाईनबार असे ५२४ परवानाधारक आहेत. त्यातील ३३३ परवानाधारक सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामध्ये देशी दारू विक्रेते ९३, वाईन शॉप नऊ, बार-परमीट रुम १९३ व ३८ बीअर शॉपीचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक दुकाने ही वणी, पुसद विभागातील असल्याचे सांगितले जाते. उर्वरित १९१ परवानाधारकांना दारू विकण्याची मुभा राहणार आहे. कारण ते महामार्गापासून ५०० मीटरच्या आत येत नाहीत. यवतमाळ शहरातील प्रमुख मार्गांवर असलेल्या दारू विक्रेत्यांनी मात्र सत्ताधारी राजकीय मार्ग वापरुन या कारवाईतून स्वत:चा बचाव करून घेतला आहे. त्यात मोठी ‘उलाढाल’ झाल्याचे लिकर लॉबीतून सांगण्यात येते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी सकाळपासून बंदीच्या यादीतील ३३३ दारू विक्री दुकाने, शॉपी, बारची तपासणी सुरू केली. रेस्टॉरन्टला अटॅच असलेल्या वाईनबारच्या गोदामाला सील ठोकण्यात आले. जेथे साठा नाही त्यांना निलचा दाखला दिला गेला. (जिल्हा प्रतिनिधी)