नेर : वीज पुरवठा सतत खंडित राहिल्याने केळीचे पीक उद्ध्वस्त झाले. हा प्रकार तालुक्यातील मांगलादेवी येथे घडला. या शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी विद्युत कंपनी आणि तालुका प्रशासनाकडे निवेदन सादर केले. मात्र उपयोग झाला नाही. मांगलादेवी येथील सुरेशचंद पगारिया या शेतकऱ्याने एक हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड केली. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे या पिकाला आवश्यक तेवढे पाणी देता आले नाही. परिणामी केळीची संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. उन्हाच्या तडाख्यामुळेही मोठे नुकसान झाले. ही बाब पगारिया यांनी विद्युत कंपनीकडे मांडली. मात्र याविषयी गांभीर्य दाखविण्यात आले नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने रोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
मांगलादेवी येथे केळी उद्ध्वस्त
By admin | Updated: June 15, 2016 02:48 IST