शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

कर्ज ‘एनपीए’ होण्याची बँकांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील अनेक नागरी, सहकारी, मल्टीस्टेट बँका-पतसंस्थांनी विविध कारणांसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. कित्येकांना एक कोटी ते २५ कोटीपर्यंतच्या ‘सीसी लिमिट’ मंजूर केल्या आहेत. आतापर्यंत या कर्जाची परतफेड नियमित केली जात होती. परंतु कोरोना संसर्गाच्या भीतीने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या कर्जाची वसुली थांबली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे कर्ज भरले गेलेले नाही.

ठळक मुद्देकोरोना लॉकडाऊनचा परिणाम : उद्योग-व्यापार-व्यवसाय ठप्प, सर्वाधिक चिंता ‘सीसी लिमिट’ची

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय ठप्प आहेत. बहुतेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचीही परतफेड वांद्यात आली आहे. पर्यायाने कर्जाचे हे खाते बुडित (एनपीए) होण्याची भीती अनेक बँकांना आहे.जिल्ह्यातील अनेक नागरी, सहकारी, मल्टीस्टेट बँका-पतसंस्थांनी विविध कारणांसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. कित्येकांना एक कोटी ते २५ कोटीपर्यंतच्या ‘सीसी लिमिट’ मंजूर केल्या आहेत. आतापर्यंत या कर्जाची परतफेड नियमित केली जात होती. परंतु कोरोना संसर्गाच्या भीतीने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या कर्जाची वसुली थांबली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे कर्ज भरले गेलेले नाही. कारण कोरोनामुळे बाजारपेठ पूर्णत: ठप्प आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार सर्व काही थांबलेले आहे. ‘इन्कमच नाही तर कर्ज भरायचे कोठून’ असा या कर्जदारांचा सवाल आहे. हे उद्योग-व्यवसाय पूर्ण क्षमतेने केव्हा चालू होणार, त्यांना नेमका काय प्रतिसाद मिळणार, मजूर उपलब्ध होतील का, तयार होणाऱ्या मालाला बाजारात मागणी राहील का आदी समस्यांमुळे कर्ज वसुलीबाबत प्रश्नचिन्ह आहे.आधीच नोटाबंदी व जीएसटीमुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली होती. त्यात आता कोरोनाचा लॉकडाऊन आल्याने सर्व काही ठप्प आहे. सर्वांचे आर्थिक व्यवहार थांबले आहे. सर्वत्र आर्थिक संकट निर्माण झाल्याने कर्जदार थकीत झाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा मासिक हप्ता लाखो रुपयात येतो. जिल्ह्यातील अनेक उद्योग, व्यापारी, व्यावसायिकांनी विविध बँकांकडून कर्ज घेतले आहे. उद्योग-व्यवसायच पूर्णक्षमतेने सुरू न झाल्यास कर्ज परतफेड होणार कशी याची चिंता कर्जदारापेक्षा बँकांना अधिक आहे. कारण बँकांना हे कर्ज बुडित खात्यात (एनपीए) जाण्याची हूरहूर लागली आहे.बँका-मल्टीस्टेट-पतसंस्थांनी अशाच पद्धतीने अनेकांना कर्ज-सीसी लिमिट मंजूर केली आहे. या कर्जाची वसुली तूर्त जवळजवळ थांबली आहे. त्यामुळे बँकांच्या थकबाकीचा आकडा वाढतो आहे. हा वाढणारा आकडा बँकांसाठी कमालीचा चिंतेचा विषय ठरतो आहे. ही वसुली होणार की नाही, झाली तरी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, त्याचा बँकींगवर काय परिणाम होईल, हेच मुद्दे बँक प्रमुखांच्या बैठकीत कायम चर्चेचा विषय ठरत आहे. कित्येकांची कर्ज भरण्याची क्षमता आहे. मात्र पंतप्रधानांनी तीन महिने कर्जाची वसुली करू नका असे सांगितल्याने पैसे असूनही अनेकांनी कर्ज भरणे टाळले आहे, हे विशेष. गरजवंत आणि श्रीमंत दोघांनीही कर्ज भरणे थांबविल्याने बँकांची आर्थिक घडी विस्कटते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.रिझर्व्ह बँकेचा बँकींग परवाना असलेल्या बँकांना कर्जाच्या हप्त्याला मुदतवाढ देण्याचे निर्देश आहेत. मात्र त्यानंतरही व्याज मिळेल की नाही, याची चिंता या बँकांना आहे. हा परवाना नसलेल्या मल्टीस्टेट व पतसंस्थांना मात्र कर्जाच्या हप्त्याला मुदतवाढीचे आदेश लागू नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे या कर्जाच्या वसुलीचा प्रश्न कायम आहे. या थकबाकीमुळे अनेक बँकांचा एनपीए सध्याच नियोजित स्टॅन्डर्ड पेक्षा किती तरी अधिक वाढला आहे.मासिक कर्ज हप्ता कपात मात्र सुरूचकोरोना व लॉकडाऊनमुळे पुढील तीन महिने कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या परतफेडीचा मासिक हप्ता (ईएमआय) कापला जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. तशा सूचना बँकांना दिल्या गेल्याचेही सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात बँकांकडून कर्जाच्या मासिक हप्त्याची सर्रास वसुली केली जात आहे. बँक खात्यात पैसे असेल तर लगेच हप्ता कापून घेतला जातो. तीन महिने कर्ज वसुली होणार नसल्याचे सांगितले गेले तरी या तीन महिन्याची वसुली कर्जाच्या शेवटी होणार आहे. अर्थात तीन इन्स्टॉल्टमेंट कर्जात वाढणार आहे, कर्ज कपातीचे तीन महिने पुढे वाढविले जातील, त्यावरील व्याजही कायम राहणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या घोषणेचा प्रत्यक्ष लाभ किती व नेमका कुणाला हा संशोधनाचा विषय आहे.जिल्हा बँकेचा ‘एनपीए’ ३४ टक्केपीक कर्जासह मध्यम व दीर्घमुदती कर्ज देणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एनपीए’ सध्या ३४ टक्क्यावर आहे. गेल्या वर्षी तो ४४ टक्के होता. त्यात दहा टक्क्याची घट झाली आहे. वास्तविक एनपीएचे स्टॅन्डर्ड प्रमाण पाच ते १५ टक्के आहे. मात्र त्यानंतरही जिल्हा बँकेचा एनपीए दुप्पट अर्थात ३४ टक्क्यावर पोहोचला आहे. कर्जाचे पुनर्गठन, शासनाकडील माफीच्या रकमेसाठी करावी लागणारी प्रतीक्षा ही कारणे या वाढत्या एनपीए मागे व्यवस्थापनाकडून सांगितली जात आहेत.

टॅग्स :bankबँक