शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

बोरी स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: June 20, 2016 02:17 IST

भारतीय स्टेट बँकेच्या बोरीअरब येथील शाखेचे संपूर्ण व्यवहार गेल्या १९ दिवसांपासून ठप्प पडले आहे.

बीएसएनएल सेवा कोलमडली : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेटबोरीअरब : भारतीय स्टेट बँकेच्या बोरीअरब येथील शाखेचे संपूर्ण व्यवहार गेल्या १९ दिवसांपासून ठप्प पडले आहे. बीएसएनएलची सेवा कोलमडल्यामुळे बँकेचा कोणताही व्यवहार पूर्ण होणे अशक्य झाले आहे. या परिस्थितीमुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी रविवारी येथे भेट देऊन माहिती घेतली.बोरीअरब शाखेतून परिसरातील २४ गावांचा आर्थिक व्यवहार चालतो. शेतीच्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप आणि थकीत कर्जाचे पुनर्गठन कर्ज मंजूर करणे ही कामे तातडीने होण्याची गरज आहे. मात्र नेमक्या याच दिवसात बीएसएनएल लिंक नसल्याने बँकेचे व्यवहार ठप्प पडले आहे. गेल्या १९ दिवसांपासून बँकेत व्यवहार होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर होवून पैसे मिळत नसल्याने त्यांची एकप्रकारे अडवणूकच सुरू आहे. बियाणे खरेदी करणे कठीण झाले आहे. अनेकांचे पैसे बँकेत जमा असूनही ते मिळणे दुरापास्त झाले आहे. नगदी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे घेता येत नाही. दारव्हा-यवतमाळ रोडवर असलेल्या बोरीअरब गावात भारत संचार निगमची नवीन फोर-जी लाईन जमिनीतून खोदकाम करून टाकणे सुरू आहे. अशावेळी जुनी चालू स्थितीत असलेली भारत संचार निगमची वायर अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे बोरीअरब येथील बीएसएनएलच्या सर्वच ग्राहकांना फटका बसत आहे. त्यामुळे येथील स्टेट बँकेचे सर्व व्यवहारही १९ दिवसांपासून ठप्प आहे. यात शेतकऱ्यांप्रमाणेच कर्मचारी व सेवानिवृत्तांनाही चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. भारत संचार निगमचे अधिकारी मात्र आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यातच धन्यता मानत आहे. स्टेट बँकेचे कर्मचारी दररोज बँकेत जावून लिंक येण्याची वाट पाहतात, तर शेकडो शेतकरी बँकेत चकरा मारून त्रस्त झाले आहे. (वार्ताहर)‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ मोहिमेला फटकाबळीराजा चेतना अभियानांतर्गत सुरू असलेल्या अर्ज द्या कर्ज घ्या या मोहिमेलाही बोरीअरब येथील बीएसएनएल सेवा बंद असल्यामुळे फटका बसला. येथील स्टेट बँकेच्या शाखेत या मोहिमेसाठी रविवारी १९ जून रोजी कॅम्प घेण्यात आला. मात्र बीएसएनएल सेवा नसल्याने फटका बसला. वर्ष २०१४-१५ चे थकीत कर्जदार शेतकरी यांनी अर्ज करून त्वरित कर्जाचे पुनर्गठन व त्यातून मागील कर्जाचा हप्ता न कापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु गेल्या पंधरवड्यापासून या बँकेचे लिंक बंद असल्याने अर्ज द्या, कर्ज घ्या अभियानातून कोणतेही काम होवू शकले नाही. या अभियानात शिवसेनेचे योगेश इलमे यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी बँकेसमोर मंडप टाकून ७८३ अर्ज पुनर्गठनासाठी जमा करून घेतले. स्टेट बँक अधिकाऱ्यांकडे मात्र एकही अर्ज केला नाही.