शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज नाकारणाऱ्या उमरखेडच्या बँकेची खासदारांपुढे पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:23 IST

शेतकऱ्यांना कर्ज नाकारण्यासह उर्मट वागणूक देणाऱ्या बँक व्यवस्थापकाची बंदीभागातील शेकडो शेतकऱ्यांनी थेट खासदारांपुढे पोलखोल केली. खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात व्यवस्थापकाला घेराव घातला. नंतर तहसील कार्यालयात खासदारांनी घेतलेल्या ‘जनता दरबारात’ बँक व्यवस्थापकाच्या विविध कारनाम्यांचा पाढाच वाचण्यात आला.

ठळक मुद्देशेकडो शेतकऱ्यांचा घेराव : ८० वर्षीय शेतकरी म्हणाला, मला धक्के देऊन बाहेर काढले

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शेतकऱ्यांना कर्ज नाकारण्यासह उर्मट वागणूक देणाऱ्या बँक व्यवस्थापकाची बंदीभागातील शेकडो शेतकऱ्यांनी थेट खासदारांपुढे पोलखोल केली. खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात व्यवस्थापकाला घेराव घातला. नंतर तहसील कार्यालयात खासदारांनी घेतलेल्या ‘जनता दरबारात’ बँक व्यवस्थापकाच्या विविध कारनाम्यांचा पाढाच वाचण्यात आला.दराटी गावातील नागरिकांनी उमरखेड येथील सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक ए. आय. कनवर यांच्या वागणुकीबाबत खासदार राजीव सातव यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत खासदारांनी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार भगवान कांबळे, सहायक निबंधक भालेराव व शेकडो तक्रारकर्त्यांसह बँक व्यवस्थापकांना धारेवर धरले.व्यवस्थापकाच्या कारभाराचा फटका सहन केलेले ८० वर्षीय भिकू राठोड यांनी आपबिती सांगतांना म्हटले की, माझ्यावर एकही रुपया कर्ज नाही. मी कर्जासाठी बँकेच्या साहेबाजवळ गेलो. तर मला स्वत: त्यांनी धक्के देऊन बाहेर काढले. अशाच प्रकारच्या तक्रारी शेकडो जणांनी मांडल्या. कर्जमाफीची यादी बँकेत न लावणे, येणाऱ्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कार्यवाहीची धमकी देणे, ग्राहकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, यासोबतच शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवणे असे गंभीर आरोप त्यांच्यासमक्ष नागरिकांनी केले. तर त्यांनी यापूर्वी उमरखेड, दराटी पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी देऊन ग्राहकावर गुन्हे नोंद केल्याचीही माहिती खासदार सातव यांना देण्यात आली.यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडे, सोनू खतीब, किशोर चवरे, नंदकिशोर अग्रवाल, बालय्या दुर्गमवार, जुबेर कुरेशी, शे. तालीब आदी उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक