शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सात ग्रामपंचायतींचे बँक खाते गोठविले

By admin | Updated: January 26, 2016 03:09 IST

नगर परिषदेच्या हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींचे बँक खाते गोठविण्यासाठी नोटीस बजावण्यात आली.

यवतमाळ : नगर परिषदेच्या हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींचे बँक खाते गोठविण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. सोमवारी दुपारी नगर परिषदेचे उपमुख्याधिकाऱ्यांनी सात ग्रामपंचायतींना नोटिफिकेशनची प्रत देऊन महत्वपूर्ण देस्तावेज जमा करण्याची नोटीस बजावली. ग्रामपंचायतीचे कॅशबुक बुक, चेक बुक, बँकेचे खातेपुस्तक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती रजिस्टर ताब्यात घेतले जाणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे यापुढे नगर परिषदेच्या बँक खात्यातून मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वेतन केले जाणार आहे. यासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. सोमवारी दुपारी उपमुख्याधिकारी गोलंदाज यांनी लोहारा, मोहा, वाघापूर, पिंपळगाव, वडगाव व उमरसरा या ग्रामपंचायत कार्यालयांना भेट दिली. येथे एकही ग्रामसचिव व ग्रामविकास अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या लिपिकाला नोटीस व हद्दवाढीच्या नोटीफिकेशनची प्रत देऊन संपूर्ण दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)वाढीव क्षेत्रातील कर आकारणी ‘जैसे थे’४ समाविष्ठ झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना गृहकराबाबत पूर्वीच्या आकारणीप्रमाणेच कर भरता येईल. त्यासाठी सध्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात डिमांड रजिस्टर ठेवण्यात येईल. या कर वसुलीसाठी स्वतंत्र बँक खातेही सुरू ठेवले जाईल. ही कर वसुलीची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात राहणार आहे, मालमत्ता मुल्यांकन झाल्यानंतर नगर परिषदेच्या दराने कर आकारणी केली जाईल, असे यवतमाळ नगर परिषेदचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी लोकमतला सांगितले. शहर सीमेवर यवतमाळ नगरपरिषदेचे फलक ४शहराच्या आतमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवर यवतमाळ नगर परिषदेची हद्द प्रारंभ असे फलक लावण्यात येणार आहे. यापूर्वी नगर परिषद परिसराला लागूनच ग्रामपंचायती असल्याने हद्दीच्या बाबत गोंधळ होत होता. आता मात्र चारही बाजूला नगर परिषद हद्द निश्चित झाली आहे.