यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली. यासाठीचा पहिला टप्पा जिल्ह्याकडे वळता झाला. मात्र सव्वा लाख शेतकऱ्यांचे बँक खातेच गवसले नाही. परिणामी एकूण मिळालेल्या निधीपैकी केवळ ७७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.जिल्ह्यातील आठ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना १८४ कोटी २० लाख रुपये मिळणार होते. यापैकी १२२ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याकडे वळता झाला आहे. उपलब्ध बँक खाते आणि गावाच्या आद्याक्षरानुसार एक लाख ४२ हजार ५८ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ७७ कोटी ५५ लाख ८२ हजार ९८९ रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. २६ जानेवारीपर्यंत सर्व निधी बँक खात्यात जमा करण्याचे आदेश होते. प्रत्यक्षात प्राप्त निधीपैकी ४५ कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अद्यापही जमा करता आला नाही. महसूल विभागाच्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते मिळाले नाही. (शहर वार्ताहर)
बँक खात्याचा ‘दुष्काळ’
By admin | Updated: January 28, 2015 23:40 IST