शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बांगरनगरात दगडाने ठेचून तरुणाचा खून

By admin | Updated: August 10, 2016 01:08 IST

लहान मुलांना मारहाण करून त्रस्त करणाऱ्या एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना

मारहाणीचा वचपा : तीन अल्पवयीनांना केली अटक यवतमाळ : लहान मुलांना मारहाण करून त्रस्त करणाऱ्या एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना येथील बांगरनगर परिसरातील पेट्रोल पंपासमोर सोमवारी रात्री १०.३० वाजता सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांनी खुनाची कबुली पोलिसांपुढे दिल्याची माहिती आहे. अक्षय अजय रामटेके (२२) रा. पाटीपूरा असे मृताचे नाव आहे. अक्षय हा कोणत्याही कारणावरून या प्रकरणात ताब्यात असलेल्या बालकांना सतत मारहाण करत होता. सोमवारी अक्षयने दोन हजार रुपये घेऊन एका मुलाला बोलावले होते. अक्षय दोन महिन्यापासून या तिघांकडून मारहाण करून पैसे घेत होता. कधी तोंडावर ठोसा मार तर कधी छातीवर यामुळे तीघेही जण धास्तावले होते. सोमवारी अक्षयला देण्यासाठी आठशे रूपये घेऊन हे तिघे गेले होते. त्याने पैसे घेण्यास नकार देत एकाच्या हातावर चाकू मारला. त्यावेळी अक्षयच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर वार केला तसेच दगडाने ठेचून मारहाण केली. या घटनेने बांगरनगर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध सुरू झाला. मारेकऱ्यांनी वडगाव येथील मोक्षधामात आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्री १ वाजता अटक केली. ही कारवाई अ‍ॅन्टीगँग सेलच्या पथकाने केली. खूनाच्या घटनेनंतर पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी घटनास्थळाला भेट दिली. तीनही विधीसंघर्षग्रस्त बालक भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. तर एक जण अकरावीत आहे. या प्रकरणी विजय भीमराव धुळे रा. अशोकनगर याने आपल्या तक्रारीत भांडणाचा वचपा काढण्यासाठी अक्षयला बोलावून त्याचा खून केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)