शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:09 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या विदर्भ बंदला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देस्वतंत्र विदर्भ राज्य : बाजारपेठ बंद, वणी, उमरखेडमध्ये मोर्चा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या विदर्भ बंदला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यवतमाळ, उमरखेड आणि वणी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. उमरखेड व वणी येथे मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापारी प्रतिष्ठानांसह शैक्षणिक संस्थाही बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी विदर्भ बंदचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार यवतमाळ शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला. विदर्भवाद्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. दत्त चौक, नेताजी मार्केट, मेनलाईन, टांगा चौक यासह आझाद मैदानावर स्वेटर विक्रीसाठी आलेल्या तिबेटीयन बांधवांनीही आपली दुकाने बंद ठेवली. यासोबतच शहरातील शाळा, महाविद्यालयेही बंदमध्ये सहभागी झाली होती. बंद दरम्यान यवतमाळ शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारनंतर मात्र व्यवहार सुरळीत सुरू झाले. जिल्ह्यात कुठेही वाहतुकीलाही फटका बसला नाही. यवतमाळात आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे अध्यक्ष कृष्णराव भोंगाडे यांनी केले. यावेळी डॉ. विजय चाफले, अशोक कपिले, भरत तोंदवाल, मनोज चमेडिया, प्रदीप धामणकर, निखील खरोडे, अशोक पोहेकर, तुकाराम खडसे, मनोहर सहस्त्रबुद्धे, अनिल कालोकर, लकी लष्करी, श्रीधर ढवस, किशोर परडखे आदी सहभागी झाले होते.वणी येथे विदर्भवाद्यांनी टिळक चौकात एकत्र येऊन मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार वणीत कडकडीत बंद पाळण्यात आला.उमरखेड येथे स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, अशा घोषणा देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तसेच मोर्चाही काढण्यात आला. विदर्भवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.अन्याय निवारण समितीस्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमध्ये अन्याय निवारण समितीने सहभाग नोंदविला. नेताजी मार्केट, बसस्थानक परिसरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन या समितीने केले. बंदमध्ये समितीचे गणेश कोसरकर, शेख जाकीर, मोतीराम सिंह, सुधाकर गुल्हाने, राज बतरा, अंकुश साठवणे, दिनेश पाचकवडे, अनुप तेला, वहिद अकबानी आदींनी सहभाग नोंदविला.