शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तरोडा येथील बंधारे निकृष्टच

By admin | Updated: July 15, 2016 02:39 IST

तालुक्यातील तरोडा येथे निर्माण करण्यात आलेल्या तीनही सिमेंट बंधाऱ्यांची कामे प्राकलन डावलून करण्यात आली. या कामात अनेक त्रुटी आहेत.

एसडीओकडून तपासणी : जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर कळंब : तालुक्यातील तरोडा येथे निर्माण करण्यात आलेल्या तीनही सिमेंट बंधाऱ्यांची कामे प्राकलन डावलून करण्यात आली. या कामात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येते, असा अहवाल उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. कळंब तालुक्यातील तरोडा येथे निकृष्ट बंधारे उभारण्यात येत असल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, तालुका कृषी अधिकारी के. बी. आठवले यांच्या पथकाने बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. यामध्ये सिमेंट नालाबांधापासून नालापात्रामध्ये सोडलेल्या बर्मची लांबी जास्त असणे. दगडी पिचिंग न करणे. पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी कुठलाही प्रयत्न न करणे. नाला खोलीकरणातून निघालेली माती नाल्याच्या दोन्ही काठावर अस्ताव्यस्त टाकणे. माती वाहून न नेणे. त्यामुळे ही टाकलेली माती पुन्हा नाल्यात कोसळू शकते. त्यामुळे पाणीसाठा कमी होऊन मूळ उद्देश सफल होणार नाही. बांधाला आकार देऊन त्याचा टॉप व्यवस्थित करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी बांधाची खोली व रुंदी कमी आढळून येते. तीनही सिमेंट नाल्याचे बांधकाम प्राकलनानुसार झाल्याचे दिसून येत नाही, असा अहवाल उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे पाठविला आहे. तसेच याची माहिती बेंबळा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. तसे पाहिल्यास, सुरुवातीपासूनच या बंधाऱ्यांची कामे प्राकलनानुसार करण्याची कोणी तसदी घेतली नाही. बंधाऱ्याची खोली बहुतेक ठिकाणी राखल्या गेली नाही. मातीचे केवळ ढिगारे मारण्यात आले. कुठेही बर्म सोडण्यात आले नाही. आवश्यक ठिकाणी माहिती वाहून नेणे गरजेचे असताना एकही ब्रास माती वाहून नेण्यात आली नाही. राजकीय वरदहस्त असलेले कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधांमुळे हा प्रकार झाल्याचे उघडपणे बोलले जाते. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या अहवालावर ते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)