शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

सेनेत उमेदवारांची आयात बंद

By admin | Updated: January 31, 2015 23:26 IST

शिवसेनेला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात ऐन वेळेवर उमेदवार आयात करावे लागले. आता अशा उमेदवारांना

गजानन कीर्तीकर : शिवसंपर्क अभियानाचा समारोप, शिवसैनिकांतून शोधणार नेतृत्व यवतमाळ : शिवसेनेला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात ऐन वेळेवर उमेदवार आयात करावे लागले. आता अशा उमेदवारांना शिवसेनेत घेतले जाणार नाही. शिवसैनिकांनी आज पासूनच स्वबळावर लढण्याची तयारी करावी, असे आवाहन शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर यांनी केले. येथील शिवसंपर्क अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐन वेळेवर शिवसेनेला दगा दिला. त्यामुळे काही ठिकाणी उमदेवार शोधण्यासाठी धडपड करावी लागली. अशा बाहेरून आणलेल्या उमेदवारांच्या भरवशावर निवडणूक लढता येत नाही हे आता कळून चुकले आहे. पक्षातच १० ते १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाणार आहे. २०१९ ची किंवा त्यापूर्वीच होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे. आता शिवसेनेत निष्क्रीयता खपवून घेतली जाणार नाही. आपण सत्तेत असलो तरी त्याचे समाधान नाही. एकेकाळी शिवसेनेची सत्ता होती, अजुनही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. त्यासाठीच संघटन बांधणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सात पैकी किमान पाच विधानसभा शिवसेनेला काबीज करावयाच्या आहे. पक्षात १० ते १५ वर्षांपासून काम करणारी माणसे एकही जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती आणू शकत नाही अशांनी आता बाजुला व्हावे अथवा कामात सुधारणा करावी असा इशाराही खासदार गजानन कीर्तीकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. या विधानसभेत पुसदमध्ये मनोहर नाईकांनी शिवसेनाच खिशात टाकल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यापुढे कदापीही उमेदवार वेळेवर आयात केल्या जाणार नाही, असे कीर्तीकर यांनी स्पष्ट केले. सत्तेत असलो तरी जनतेच्या कामासाठी शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. संघर्षातून उभा ठाकलेला पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराघरात शिवसैनिक तयार करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवसंपर्क अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार अनंत तरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, संतोष ढवळे, प्रवीण पांडे, बाबू पाटील जैत, किशोर इंगोले, गजानन डोमाळे, पराग पिंगळे, नगराध्यक्ष पवन जयस्वाल आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)