शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा जलसंजीवनीत अधरपूसला भोपळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७३८ कोटी रुपये घोषित केले. मात्र या पॅकेजमध्ये महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाला भोपळा मिळाला आहे.

ठळक मुद्देसापत्न वागणूक : दहा वर्षांपासून दुरुस्तीची मागणी, सिंचनाचे स्वप्न अद्यापही अपूर्णच

संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७३८ कोटी रुपये घोषित केले. मात्र या पॅकेजमध्ये महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाला भोपळा मिळाला आहे. विशेष म्हणजे गत दहा वर्षांपासून प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली जात आहे.बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे मुख्यमंत्र्यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेचे उद्घाटन केले. जिल्ह्यातील लहान-मोठ्या १५ सिंचन प्रकल्पांसाठी पॅकेज घोषित केले. या घोषणेमुळे महागाव तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु शासनाने घोषित केलेल्या १५ प्रकल्पात महागाव तालुक्यातील अधर पूस प्रकल्पाचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे शेतकºयांचा भ्रमनिरास झाला. आता हे अपयश कोणाचे, शासकीय अधिकाऱ्यांचे की लोकप्रतिनिधींचे यावर चर्चा होत आहे.अधर पूस प्रकल्पाची सिंचन क्षमता दहा हजार हेक्टर आहे. परंतु प्रकल्प निर्मितीपासून आतापर्यंत कधीच पूर्णक्षमतेने सिंचन झाले नाही. प्रत्येक वर्षी सिंचनात वाढ होण्याऐवजी ती कमीच होत आहे. सध्या केवळ दोन हजार हेक्टरवर सिंचन येऊन ठेपले आहे. गेल्या ३० वर्षात कधीच देखभाल दुरुस्तीसाठी पैसा आला नाही. प्रकल्पाच्या संपूर्ण लघुवितरिका मातीने बुजल्या आहेत. त्यामध्ये झुडूपे वाढली आहे. ५० किलोमीटर अंतरावरील ८० टक्के नाल्यावरील सिमेंट पाईप फुटले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय सुरू आहे. सर्व गेट तुटले आहे. सवना, वेणी आणि पोहंडूळ या शाखेला २० किमी अंतरात मुख्य कालव्यासह त्यावरील दहा लघु वितरिका आणि तेवढ्याच उपवितरिका देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या आहे. अशा या प्रकल्पासाठी बळीराजा जलसंजीवनी योजनेतून निधी मिळेल, अशी आशा होती. परंतु सापत्न वागणुकीचा फटका या प्रकल्पाला पर्यायाने शेतकऱ्यांना बसत आहे.कर्मचाऱ्यांचा तुटवडाएका शाखेला २२ कर्मचाºयांची गरज असताना दोन कर्मचारी येथील ५० किलोमीटरचा कारभार पाहतात. यावरूनच येथील प्रकल्पाच्या कामाचा अंदाज बांधता येतो. सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून २० वर्षापूर्वी २० कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. तो तीन वर्षापूर्वी त्रुट्या काढत काढत पाच कोटींवर आला. २० वर्षात एकाही अभियंत्याला त्रुट्यांची पूर्तता करता आली नाही. लाखो शेतकºयांच्या जिव्हाळ्याचा हा प्रकल्प कायम उपेक्षित आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही.