शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा चेतना अभियानाला भ्रष्टाचाराचा डंख

By admin | Updated: September 18, 2016 01:22 IST

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

१९ कोटींच्या वितरणात ७७ तक्रारी : नियुक्त संपर्क अधिकारी गावात पोहोचलेच नाहीरूपेश उत्तरवार  यवतमाळबळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. १९ कोटींच्या वितरणात गैरप्रकार झाल्याच्या ७७ तक्रारी आल्या आहेत. अभियानातील निधीबाबत पारदर्शक असण्यासाठी १०१ संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. मात्र, बहुतांश संपर्क अधिकाऱ्यांनी गावाला भेटीच दिल्या नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अभियानातून महसुली गावांमध्ये प्रत्येकी एक लाख रूपयांचा निधी वळता करण्यात आला. हा निधी गरजवंत शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या. त्याकरिता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडीसेविका यांच्या संयुक्त बैठकीत मदत वाटपाचा निर्णय घ्यायचा होता. प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जवळच्या नातेवाईकाला मदत वितरित केली. त्याची यादी लावली नाही. ७७ तक्रारी पुढे आल्या आहेत. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मागविला आहे. या तक्रारीवर काय कारवाई झाली, याची माहिती मागविण्यात आली आहे. गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी बळीराजा चेतना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि प्रशासन लोकाभिमुख करणे यासाठी १०१ मंडळनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याकरिता वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात १६ तहसीलदार, १६ गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, खनिकर्म अधिकारी, नायब तहसीलदार, दुग्ध, नियोजन, औद्योगिक विकास महामंडळ, पुरवठा आणि विक्रीकर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या संपर्क अधिकाऱ्यांनी १३ जूनपासून महिन्यात दोन भेटी देण्याच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्याच नाही. यामुळे गावातील शेतकऱ्यांची नावे, तेथील प्रश्न आणि उपाययोजनांची माहितीच अधिकाऱ्यांना नाही. यामुळे महत्त्वाकांक्षी अभियानावर परिणाम झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कोणते पाऊल उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.