शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

दिग्रस येथे बहुजन क्रांती मोर्चा धडकला

By admin | Updated: May 16, 2017 01:34 IST

समाजातील सर्व जाती समूह व विविध घटकांचे एकत्रीकरण करून बहुजन समाजाच्या हक्क, ...

३६ विविध मागण्यांचे निवेदन : बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : समाजातील सर्व जाती समूह व विविध घटकांचे एकत्रीकरण करून बहुजन समाजाच्या हक्क, अधिकाराच्या समर्थनार्थ दिग्रस येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. भर दुपारी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये महिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संताजी महाराज सभागृहापासून हा पायदळ मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले.मोर्चेकऱ्यांनी आपल्या ३६ मागण्यांचे निवेदन राज्यपालांसाठी तहसीलदार व्ही.बी. इंगोले व एस.के. पांडे यांच्याकडे दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन खार्डे, योगेश दंदे आदी उपस्थित होते. लोकशाहीला मारक असलेल्या ईव्हीएम तत्काळ रद्द करून बॅलेटपेपरवरच मतदान घेण्यात यावे, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे जलदगती न्यायालयात निकाली काढून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गाचीही जातीनिहाय गणना व्हावी, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टची अंमलबजावणी व्हावी, मंडल कमिशन, सच्चर कमिशन व नच्चीपन कमिशनच्या शिफारशी तत्काळ लागू करण्यात याव्या, संत सेवालाल महाराजांचे रुईगड येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या दारूबंदीचे कठोर पालन व्हावे, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे, २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश होता.मोर्चात विनोद उबाळे, तिलक राठोड, वंदना खाडे, श्रेष्ठा सोळंके, पायल मडावी, नंदा कांबळे, आदित्य राहुलगडे, अतुल बोरकर, जयपाल सोनोने, एम.के. पखाले, क्षितीज ढाकणीकर, रामेश्वर पेंदोर, ओम पवार, राजू ठाकरे, अनिल भगत, दीपक मिरपासे, हरिष जीवने, अर्चना जीवने, ऋतुजा उईके, नितीन मनवर, हिमांशू राहुलगडे, गजानन सातपुते आदींसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.