शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बसवेश्वरांचा महिला स्वातंत्र्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:26 IST

महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी १२ व्या शतकात अस्पृश्यता निर्मूलनाने कार्य करून लोकशाहीची मूल्ये रूजविली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, अहिंसा आदी विचारांसह महात्मा बसवेश्वरांनी महिलांच्या स्वातंत्र्यासाठीही संघर्ष केला.

ठळक मुद्देभीमराव पाटील : पुसदमध्ये लिंगायत समाजातर्फे व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी १२ व्या शतकात अस्पृश्यता निर्मूलनाने कार्य करून लोकशाहीची मूल्ये रूजविली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, अहिंसा आदी विचारांसह महात्मा बसवेश्वरांनी महिलांच्या स्वातंत्र्यासाठीही संघर्ष केला. या विचारांचा वारसदार लिंगायत समाज असल्याचे प्रतिपादन लातूर येथील प्रा.डॉ.भीमराव पाटील यांनी केले.समाज सुधारणेचे अग्रणी महात्मा बसवेश्वर यांच्या ९१३ व्या जयंतीनिमित्त येथील वीरशैव लिंगायत समाजातर्फे स्थानिक लिंगायत मठात आयोजित व्याख्यानाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भरत्न पुरस्कार प्राप्त राजन मुखरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे विदर्भ लिंगायत समाजाचे अध्यक्ष शिरीष रामापूरे, ठाणेदार अनिलसिंह गौतम, वीरशैव लिंगायत समाज पुसदचे अध्यक्ष संतोष तडकसे उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी लिंगायत समाजातील दिवाणी न्यायाधीश उदय प्रकाश हिंगमीरे, योगाचार्य शुभांगी खके, फुटबॉलपटू समृद्धी बिडवई, बालकवयित्री समृद्धी डांगे, एमबीबीएस प्रवेशपात्र ऋतुजा तडकसे, कृष्णा व्यंकटवार, शैलेश आजेगावकर, उन्नती खके, सुशील व संध्या रोहडकर, गजानन व सुरेश मोगरे, निर्मलाबाई देऊळकर, राजन मुखरे आदींचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्रारंभी लिंगायत समाजातील शहीद जवान शुभम मुस्तापूरे परभणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शिरीष रामापूरे यांनी लिंगायत समाज स्मशानभूमी सौंदर्यीकरणासाठी ३१ हजार रुपयांचा धनादेश दिला. संचालन राणी लकडे व निशा डांगे, तर आभार सुयोग लकडे यांनी मानले. यावेळी पुसद चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार, प्रवीण व्यवहारे, रवी पद्मावार, सुशांत महल्ले, संगमनाथ सोमावार, प्रा. महाजन, विनय ठोंबरे, प्रकाश हिंगमीरे, सुशील रोहडकर, रणवीर पाटील, संजय बजाज, प्रा.प्रकाश लामणे, वरदा टाले, क्रांती भवानकर, प्रतिभा पांडे, अश्विनी तडकसे, दीपा पांडे, संगीता चाकोते, स्मिता पांडे, ताई ठोंबरे, स्नेहल खाकरे, राजश्री शिवणकर, मिनल देऊळकर आदी उपस्थित होते.