शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

रक्तदान करून बाबूजींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:14 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बाबूजींना आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देस्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जयंती : महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बाबूजींना आदरांजली अर्पण केली.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो पथक, लोकमत परिवार, प्रेरणास्थळ आयोजन समिती, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ पब्लिक स्कूल, हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील बाबूजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, प्रियदर्शनी सहकारी सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा, वायपीएसचे प्राचार्य डॉ.जेकब दास, प्राचार्य निहारिका प्रभूणे, प्राचार्य डॉ.वीरेंद्र तलरेजा, हिंदी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक शुक्ला आदी उपस्थित होते. रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.गौरव बोचरे, सामाजिक वैद्यकीय अधिकारी मोबीन डुंगे, तंत्रज्ञ राहुल भोयर, अधिपरिचारक जीवन टापरे, कक्षसेवक रामभाऊ सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्रमुखांसह प्रगती पवार, डॉ.संजय गुल्हाने, डॉ.गणेश काकड, डॉ.जितेंद्र सत्तुरवार, डॉ.पंकज पंडित, डॉ.राम तत्ववादी, डॉ.अतुल बोराडे, डॉ.दिनेश पुंड, डॉ.अजय पारडे, डॉ.सुहास तायडे, डॉ.अब्दुल अमिन, डॉ.मिलींंद लाभसेटवार, विलास देशपांडे, सुभाष यादव उपस्थित होते. शिबिरात अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी रक्तदान केले. शिबिरासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड, प्रा. आशिष माहुरे यांंनी सहकार्य केले.महाविद्यालयात वृक्षारोपणरक्तदान शिबिराच्या उद्घाटनानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसरात अमृत वृक्षांची लागवड करण्यात आली.