शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘थर्टी फर्स्ट’चा गोंधळ टाळून शेतीविषयी जागविले भान

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

जिल्ह्यात शेतीचे प्रश्न कितीही गहण बनले, शेतकऱ्यांचे जगणे कितीही मुश्कील बनले, तरीही नववर्षाच्या नावावर

यवतमाळ : जिल्ह्यात शेतीचे प्रश्न कितीही गहण बनले, शेतकऱ्यांचे जगणे कितीही मुश्कील बनले, तरीही नववर्षाच्या नावावर ‘थर्टी फर्स्ट’ला पैशाची उधळपट्टी दरवर्षीच होत आली. यंदा मात्र गरिबांच्या जखमांवर मीठ चोळणारा हा प्रकार टाळण्यासाठी लोकजागृती मंचने अनोखा उपक्रम शहरात राबविला. ज्यावेळी ‘थर्टी फर्स्ट’च्या बहाण्याने नागरिक दारूमध्ये धुंद होतात, नेमक्या त्याचवेळी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा कार्यक्रम अनेकांच्या संवेदना जागवून गेला. यावर्षी जिल्ह्यात प्रचंड दुष्काळाची स्थिती आहे. नापिकीमुळे तब्बल ३८४ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यू कवटाळला. कित्येकांनी तर केवळ सणाच्या दिवशी आपल्या मुलांना नवे कपडे घेऊन देऊ शकत नाही, या आगतिकतेपायी आत्महत्या केली. नेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने थेट पालकमंत्र्यांनाच आपल्या जीवनाची करुण कहानी सांगणारी चिठ्ठी लिहून जीव दिला. उमरखेड तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने झाडाला गळफास लावला. ऐनवेळी त्याची अर्धांगिनी पोहोचल्याने त्या शेतकऱ्याला मरणापासून परावृत्त करता आले. पण शेतकऱ्यांचे जीव गरिबीपायी जात असताना जिल्ह्यातील श्रीमंत आणि पांढरपेशा वर्गाने शेतीच्या समस्येपासून फारकत घेता कामा नये, अशी भूमिका घेवूनच लोकजागृती मंचने ऐन ‘थर्टी फर्स्ट’च्या औचित्यावरच शेतकऱ्यांचे दु:ख जगजाहीर करण्याचा कार्यक्रम आखला. येथील तिरंगा चौकात ३१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता हा सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला भूदान चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, डॉ.रमाकांत कोलते, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र ठाकरे, नरेश उन्हाळे गुरुजी, डॉ.आलोक गुप्ता, न.मा. जोशी, नागेश गोरख, विजया धोटे, साहेबराव खडसे, डॉ.छाया महाले, वर्षा निकम, शब्बीर बेग, अन्सारी चाचा, साहेबराव पवार उपस्थित होते. लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार आणि घाटंजी पंचायत समितीचे सभापती शैलेश इंगोले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला. सूत्रसंचालन हेमंतकुमार कांबळे यांनी केले. विजय दुरुतकर व त्यांच्या संचाने शेतकऱ्यांची उमेद जागविणारी गीते सादर केली. या मैफलीचे सूत्रसंचालन रूपेश कावलकर यांनी केले. शहरात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषासाठी धावपळ सुरू असतानाच या कार्यक्रमाने अनेकांची बहकलेली पावले तिरंगा चौकात खिळवून ठेवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे घोषित झाले आणि जिल्ह्यातील दुष्काळावरही शिक्कामोर्तब झाले. (स्थानिक प्रतिनिधी)दारू टाळण्यासाठी दुधाचे वाटप४‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने अनेक तरुण दारूच्या आहारी जातात. पैशाची ही उधळपट्टी गरिबांच्या जखमा ताज्या करीत असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकजागृती मंचने कार्यक्रमस्थळी दुधाचे वाटप केले. केसरयुक्त गरम दुधाच्या कढया कार्यक्रमाच्या ठिकाणी लावून तरुणांना मोफत दूध वाटप करण्यात आले. दारू ढोसण्याऐवजी दूध प्राशन करून नवी पिढी बलदंड व्हावी, असा संदेश यातून देण्यात आला.