शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचे धनादेश काढण्यास टाळाटाळ

By admin | Updated: July 5, 2014 01:35 IST

शहरात एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल बांधण्यात येत आहे.

यवतमाळ : शहरात एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल बांधण्यात येत आहे. मात्र वेळेवर निधीच मिळत नसल्याने अनेकांच्या घराचे काम अर्ध्यावच रखडले आहे. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्षित धोरण कारणीभूत ठरत आहे. शासनाच्या निधीतून घरकूल मिळाल्याने अनेक गरीब लाभार्थ्यांनी झोपडी मोडून घराचे काम सुरू केले. योजना राबविताना सुरुवातीला नगरपरिषदेतील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्याची भाषा केली जात होती. पहिला हप्ताही तितक्याच तत्परतेने देण्यात आला. वेळोवेळी पैसे मिळणार म्हणून अनेकांनी पदरमोड करून घराचे काम सुरू केले. प्रत्यक्षात बांधकामासाठी येणार खर्च आणि मिळणार निधी यात बरीच तफावत आहे. याही स्थितीत घरासाठी सर्व काही म्हणत अनेकांनी कर्जाऊ रक्कम घेऊन काम सुरू ठेवले. शेवटी आर्थिक मर्यादा आल्याने नगरपरिषद कार्यालयात लाभार्थ्यांना चकरा मारण्याची शिवाय पर्याय नाही. येथे मुख्याधिकारी कधीच उपलब्ध होत नाही. इतर कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून जातात. मुख्याधिकाऱ्यांशी दुरध्वनीवर संपर्क केल्यानंतरही ते उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत व्यथा सांगायची कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांची अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर पकड नसल्याने अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील प्रभारी कार्यालय अधीक्षक आणि लेखापालाच्या मनमानीमुळे लाभार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. बरेचदा मुख्याधिकाऱ्यांनी धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतरही तो जमा करण्यासाठी संबंधितांकडून अकारण वेळ लावला जातो. येत्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी )