शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य संमेलनात अवलिया कलावंत पेरतोय माणुसकीची बिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:58 IST

सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.

ठळक मुद्देस्वयंस्फूर्त सहभाग : गाडगेबाबांची मानवता हेच मोठे साहित्य

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. एवढेच नव्हे तर महिलांची महती कथन करून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ हा संदेश तो देत आहे. संत गाडगेबाबांच्या रुपाने मानवतेचा संदेश देऊन माणुसकीची बिजे पेरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची ही पोटतिडक कोणाच्याही नजरेतून सुटत नाही. या अवलिया कलावंताचे नाव आहे फुलचंद नागटिळक़ खैराळा ता.मांढा जि. सोलापूर हे त्याचे गाव.फुलचंद यांनी ‘नटसम्राट’ हा एकपात्री प्रयोग चार हजार ६२२ वेळा सादर केला आहे. ‘मायभूमी’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. ‘मला भेटलेली माणसे’ या त्यांच्या व्यक्तीरेखेला मोठी पसंती मिळाली आहे. जीवन जगताना त्यांना मिळालेल्या अनुभवाचे गाठोडे ते येथील साहित्य संमेलनात लोकांपुढे सोडत आहे. येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक कारणांनी गाजत आहे. असे असले तरी, फुलचंद हा एक नाट्यकलावंत माणुसकीचा संदेश देऊन लोकांसोबतच साहित्यिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविताना दिसतो. आम्ही साहित्य लिहितो, बोलतो, साहित्य खातो-पितो पण आचरणात आणणारे किती लोक आहे, असा त्यांचा सडेतोड सवाल अनेकांना निरुतर करतो आहे. मराठीची अस्मिता राखण्याचं काम कोण्या एकाचे नाही तर मराठीचा जागर सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. नजर, वाचा, मन आणि कर्म शुध्द असणे महत्वाचे आहे. कुठल्याही स्वार्थ हेतूने केलेले कार्य तडीस जात नाही. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. पण त्यांच्या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी तो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो आहे, हे सर्वांचे अपयश आहे. अनेक साहित्यिक आयत्या ‘मटेरियल’वर लिहून टिमकी मिरविण्यात धन्यता मानत आहे. खरं तर प्रसंग जगून प्रत्यक्षात येणारे साहित्य हेच खरे साहित्य असते. यात किती जण यशस्वी होतात, हा त्यांचा प्रश्न आहे. तसे पाहिले तर त्यांच्या प्रश्नातील ताकद कोणीही नाकारु शकत नाही. आज देशात अनेक मानवीय मुलभूत प्रश्न असताना इतर विषयांवरच अधिक चर्चा होते. याविषयी फुलचंद यांना जी चिंता आहे, तीच सर्वांचीच असेल. येणाºया तीन दिवसात हा अवलिया ‘परिवर्तन’ करण्याची मीमांसा बाळगून आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ